Bhiwandi Building Collapse

भिवंडीत कोहिनूर अपार्टमेंट कोसळून ९ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली.

भिवंडीत कोहिनूर अपार्टमेंट कोसळून ९ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती

अतिधोकादायक घोषित इमारत रात्री कोसळली; एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि प्रशासनाचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथे असलेली चार मजली कोहिनूर अपार्टमेंट ही इमारत रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर आणखी काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, घटनास्थळी बचाव आणि शोधमोहीम वेगाने सुरू आहे.

माहितीनुसार, कोहिनूर अपार्टमेंट ही इमारत २००७ मध्ये उभारण्यात आली होती. दोन विंग आणि एकूण ३० निवासी घरे असलेल्या या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. निकृष्ट बांधकामामुळे भिवंडी महानगरपालिकेने या इमारतीला यापूर्वीच अतिधोकादायक घोषित केले होते.

गुरुवारी तळमजल्यावरील काही पिलरमध्ये बिघाड झाल्याने त्यांची दुरुस्ती सुरू होती. सायंकाळी सुमारे सहा वाजल्यापासून इमारतीला तडे पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास संपूर्ण इमारत एका बाजूला झुकत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रभाग समिती क्रमांक ४ चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी पालिका कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि इमारत रिकामी करण्याची कारवाई केली. मात्र, त्यानंतरही तळमजल्यावरील दुरुस्तीचे काम सुरूच होते. तसेच काही रहिवासी घरातील साहित्य काढण्यासाठी पुन्हा इमारतीत गेल्याने अचानक संपूर्ण इमारत कोसळली आणि अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले.

सध्या जेसीबीसह विविध यंत्रणांच्या साहाय्याने मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस आणि भिवंडी महानगरपालिका प्रशासन संयुक्तपणे बचावकार्य राबवत आहेत.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये शमीम शेख (३२), रंजीत सिंग (४५), मिराज रसूल शेख (३४), संतोष कुमार पांडे (४२) आणि शमीम अन्सारी (३०) यांचा समावेश आहे. तसेच दोन मृतांची ओळख अद्याप पटलेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026