जागतिक पर्यावरण दिन

'एक पेड माँ के नाम' अभियान: भाजपा युवा मोर्चातर्फे नाना-नानी पार्कमध्ये वृक्षारोपण

World Environment Day: भाजपा युवा मोर्चा ने 'एक पेड माँ के नाम' अभियानात भाग घेतला. शिवाजीनगरमध्ये नाना-नानी पार्क येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबविला.

'एक पेड माँ के नाम' अभियान: भाजपा युवा मोर्चातर्फे नाना-नानी पार्कमध्ये वृक्षारोपण

World Environment Day

नांदेड (World Environment Day) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने शहरात पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'एक पेड माँ के नाम' या देशव्यापी अभियानांतर्गत शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध नाना-नानी पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले. या (World Environment Day) उपक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे महानगर अध्यक्ष शशिकांत पाटील क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

६ मे रोजी झालेल्या या कार्यक्रमादरम्यान नाना-नानी पार्कच्या परिसरात विविध प्रकारच्या सावली देणाऱ्या आणि पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी बोलताना महानगर अध्यक्ष शशिकांत क्षीरसागर यांनी वाढत्या तापमानावर आणि पर्यावरणाच्या ढासळत्या संतुलनावर चिंता व्यक्त केली. "केवळ वृक्षारोपण करून न थांबता, लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारीही आपण घेतली पाहिजे," असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना व नागरिकांना केले.

या (World Environment Day) वृक्षारोपण मोहिमेला भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. 'एक पेड माँ के नाम' या संकल्पनेला दाद देत प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल राखण्याची शपथ घेतली.या प्रसंगी भाजपा सरचिटणीस विजय येवणकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत क्षीरसागर,करण चव्हाण, प्रियेश ठाकूर,शिवा लोट,बालाजी बोकारे, सचिन नरंगले, किरण पारडे, शुभम खोडके यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते  उपस्थित होते.

संबंधित सामग्री

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
सुपर एल निनोचा जगाला मोठा धोका; ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज, भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता

सुपर एल निनोचा जगाला मोठा धोका; ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज, भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता

सुपर एल निनोमुळे जगभरात ४.५१ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज असून भारतात १५,८०० मृत्यूंची शक्यता. महाराष्ट्रातही १००% दुष्काळाचा इशारा.

Sep 24, 2026
चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीत जयस्तंभ चौक ते खामगाव चौफुली मार्गावर सुरू असलेल्या वृक्षलागवडीची नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पाहणी करून वृक्षसंवर्धनाच्या सूचना दिल्या.

Sep 17, 2026
इस्रोचा इशारा...चक्रीवादळाचा धोका उंबरठ्यावर

इस्रोचा इशारा...चक्रीवादळाचा धोका उंबरठ्यावर

Indian Cyclone: ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तीन तीव्र चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे इस्रोच्या अभ्यासातून समोर आले आहे. इस्रोच्या संशोधकांनी मागील सुमारे चार दशकांतील समुद्र..

Sep 16, 2026
मुंबई-कोलकाता बुडण्याचा धोका? UN चा गंभीर इशारा; ७७ कोटी लोकांवर संकट

मुंबई-कोलकाता बुडण्याचा धोका? UN चा गंभीर इशारा; ७७ कोटी लोकांवर संकट

जागतिक तापमानवाढीचा परिणाम आता किनारपट्टीवरील शहरांसाठी अधिक गंभीर होताना दिसत आहे.

Sep 02, 2026