Bhadgaon Murder

जळगावच्या भडगावमध्ये रुद्राक्ष विक्रीच्या पैशांवरून वाद विकोपाला; बॅगेत मृताचे दात आणि दोन जिवंत कबुतरे आढळली

भडगावमध्ये 800 रुपयांच्या वादातून तरुणाचा मृत्यू झाला. संशयित आरोपीला पोलिसांनी शेतातून ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

जळगावच्या भडगावमध्ये रुद्राक्ष विक्रीच्या पैशांवरून वाद विकोपाला; बॅगेत मृताचे दात आणि दोन जिवंत कबुतरे आढळली

Bhadgaon Murder

भडगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव परिसरात अवघ्या 800 रुपयांच्या पैशांच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्मा जुगा पवार असे मृत तरुणाचे नाव असून, जुगा कांतिलाल पवार हा या प्रकरणातील संशयित आरोपी आहे. भडगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

धर्मा पवार आणि जुगा पवार हे दोघेही गावोगावी फिरून बनावट रुद्राक्ष विक्रीचे काम करत होते. घटनेच्या दिवशी धर्मा याने 800 रुपयांचे रुद्राक्ष विकले होते. त्यानंतर सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास दोघे भडगाव स्टेशन परिसरात दारू पिण्यासाठी बसले. यावेळी रुद्राक्ष विक्रीतून मिळालेल्या 800 रुपयांच्या वाटपावरून दोघांमध्ये वाद झाला.

पैशांवरून सुरू झालेला वाद वाढल्यानंतर जुगा पवार याने जवळ पडलेल्या दगडाने धर्मा पवार याच्यावर हल्ला केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या घटनेत धर्मा याचा मृत्यू झाला.

आरोपी शेतात आढळला

घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जवळच्या शेतातून कुत्रे भुंकत असल्याचा आवाज येत असल्याने पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला. त्यावेळी आरोपी जुगा पवार हा दारूच्या नशेत शेतात बसलेला आढळून आला.

पोलिसांनी आरोपीची बॅग तपासली असता त्यामध्ये मृत धर्मा पवार याचे दात आणि खाण्यासाठी ठेवलेली दोन जिवंत कबुतरे आढळून आली. या प्रकारामुळे तपास पथकाला धक्का बसला. पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले.

या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमागील परिस्थिती आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत. निखिल यादव-नितेश पवारांची चौकशी सुरू असून मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीचीही शक्यता.

Oct 03, 2026