प्रभाग ११ व १२ मध्ये आयुष्मान भारत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांना आरोग्य सुरक्षा योजनेची माहिती; लाभार्थी नोंद

नगरसेवक दिपक वाधवाणी यांच्या पुढाकारातून आणि चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर उत्साहात पार पडले.

प्रभाग ११ व १२ मध्ये आयुष्मान भारत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांना आरोग्य सुरक्षा योजनेची माहिती; लाभार्थी नोंद

Ayushman Bharat Camp

चिखली (Ayushman Bharat Camp) : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने प्रभाग क्रमांक ११ व १२ मध्ये आयुष्मान भारत शिबिराचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक दिपक वाधवाणी यांच्या पुढाकारातून आणि चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर उत्साहात पार पडले.

शिबिरामध्ये नागरिकांना आयुष्मान भारत योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्ड तयार करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य संरक्षण उपलब्ध होत असल्याने गंभीर आजारांवरील उपचारांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते. शासकीय तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध असल्याने सामान्य नागरिकांसाठी ही योजना अत्यंत लाभदायी ठरत आहे.

यावेळी नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुशराव (काका) पडघान, माजी नगरसेवक विलास कंटूले, शहराध्यक्ष सागर पुरोहित, चेतन देशमुख, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नईम सौदागर, सुशीलकुमार जाधव, शरदसेठ भाला, कौसर ठेकेदार, आजम ठेकेदार, सय्यद जुबेर, गजू तारू, राम सुरडकर, विजय गाडेकर, माधव कुलकर्णी, अक्षय शर्मा, रामेश्वर खराबे, मयूर शर्मा, भीमराव तुपसौंदर, राजेश पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी आयुष्मान भारत योजनेची माहिती जाणून घेत नोंदणी केली. आरोग्यविषयक शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील शेळके, शुभम राजपूत, दर्शन शर्मा, साकिबभाई, गणेश सुरूशे, मुजीब शेख, ज्ञानेश्वर चव्हाण, नारायण शितोळे, विलास उबरहंडे व संतोष बहिर यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनीही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य सुरक्षा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

संबंधित सामग्री

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रहिवासी तालुक्यातील बँकांमधूनच पीक कर्ज द्या: आ. श्वेताताई महाले

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रहिवासी तालुक्यातील बँकांमधूनच पीक कर्ज द्या: आ. श्वेताताई महाले

MLA Shwetatai Mahale: तालुक्यातील बँकांमार्फतच त्याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली....

Oct 06, 2026
रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा नवा टप्पा

रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा नवा टप्पा

चिखलीतील रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या वाटचालीचा गौरव, सहकारातील विश्वास आणि ठेवीदारांच्या हितावर मान्यवरांचे भाष्य.

Sep 14, 2026
आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

MLA Shwetatai Mahale Patil: गावातील महिला व नागरिकांनी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्याकडे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची समस्या सोडविण्याची मागणी केली होती. रहिवासी भागातील

Sep 11, 2026
चिखलीत ८ सप्टेंबरला उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा; लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

चिखलीत ८ सप्टेंबरला उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा; लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात चिखली येथे ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Sep 05, 2026
बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; प्रदेश युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; प्रदेश युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

खरीप हंगाम सुरू होऊन पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही बुलढाणा जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Sep 05, 2026