परभणी कामगार मृत्यू

परभणीत ऑटो अपघातात तरुण कामगाराचा मृत्यू; दोघे जखमी

Parbhani Worker Death: गंगाखेड तालुक्यात ऑटो अपघातात तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सिरसम रस्त्यावर घडली

परभणीत ऑटो अपघातात तरुण कामगाराचा मृत्यू; दोघे जखमी

Parbhani Worker Death

 

सिरसम ते बोर्डा मार्गावर अपघात; जखमी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल

परभणी (Parbhani Worker Death) :  गंगाखेड तालुक्यात ऑटो अपघातात तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सिरसम रस्त्यावर घडली या अपघातात अन्य दोघे जखमी झाले आहेत.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड येथून बोर्डा येथे कामावर जाण्यासाठी गुरुवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी बांधकाम कामगार घेऊन जाणार्‍या अपे ऑटोसमोर सकाळी अंदाजे ९:३० ते १० वाजेच्या सुमारास अचानक कुत्र आल्याने सिरसम मार्गे बोर्डाकडे जाणार्‍या रस्त्यावर झालेल्या अपे ऑटोच्या अपघातात सुरज श्रीहरी कांबळे वय २३ वर्ष रा. महात्मा फुले नगर गंगाखेड या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर कुंदन सर्जेराव माने वय ४४ वर्ष रा. गौतमनगर गंगाखेड व आय्युब पठाण वय ३४ वर्ष रा. आझाद नगर गंगाखेड हे दोन बांधकाम कामगार जखमी झाले.

सिरसम मार्गे बोर्डा जाणार्‍या रस्त्यावर ऑटोचा अपघात झाल्याची माहिती समजताच गंगाखेड येथील खाजगी रुग्णवाहिका चालक दिपक सपकाळ यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या व अन्य वाहन धारकांच्या मदतीने तिघांना ही गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी मुंडे, परिचारिका अश्विनी मुंडे, पल्लवी माने, द्वारकादास बडे आदींनी उपचार करून सुरज श्रीहरी कांबळे यास मयत घोषित केले. याप्रकरणी जखमी कुंदन माने या कामगाराच्या जबाबावरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026