औंढा नागनाथ (Siddheshwar Dam Water Storage) : अर्धा पावसाळा संपला असून पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने पीक परिस्थिती चांगली असली तरी हिंगोली जिल्ह्यासह औंढा नागनाथ तालुक्यात भविष्यात सिंचन व पिण्याच्या पाण्याचा ताण वाढणार हे मात्र निश्चित. जिल्ह्यामध्ये ६४ टक्के पावसाची तूट निर्माण झाल्याने भविष्यातील दुष्काळाचे ढग अधिक गडद होताना दिसत असून सध्या स्थितीत जिल्ह्यातील पीक परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. शेतकरी बांधव दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत तर सध्या अत्यल्प पावसामुळे खरीप पिकांवर रोगराईचे भरमसाठ प्रमाण वाढले आहे.
दोन दिवसात थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरीही समाधानकारक पाऊस मात्र झालाच नाही. औंढा नागनाथ तालुक्यातील सर्वच लघु तलावात नगण्य जलसाठे आहेत.जून महिन्यात पावसाचा मोठा ताण पडल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या हजेरीने खरीप पिकांना थोडाफार दिलासा मिळाला होता मात्र आता ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सरासरी १४० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५०.३ मिमी पाऊस झाला . सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाल्याने ६४ टक्के तूट निर्माण झाली. सोयाबीन ,तुर, उडिद, मुग,कापूस, हळद ही खरीप पिके पावसाअभावी धोक्यात आहेत.
ढगाळ वातावरना मुळे खरीप पिकावर रोगाचे प्रमाण वाढले आहे.ऑगस्ट महिना संपत आला तरीही दमदार पाऊस झाला नाही .परिणामी धरणांमध्ये ही समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला नाही. तालुक्यातील एकमेव प्रकल्प सिद्धेश्वर धरण जुलै महिन्यापर्यंत मृतसाठ्यावरच होते . जुलैच्या झालेल्या पावसाने धरणातील मृत साठा संपून पाणी पातळी ३१.६९ टक्के वर आली आहे. तालुक्यात ऑगस्टमध्ये २१.२ टक्के पाऊसाची सरासरी नोंद असून पावसाळी हंगामात जिल्ह्यात सरासरी ७९५ मीलीमीटर पाऊस पडतो मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यामध्ये१८ ऑगस्ट पर्यंत ४६१ मि.मी.५८ टक्के पावसाची नोंद झाली.
सरासरीच्या तुलनेत पाऊस अत्यल्प झाल्याने प्रकल्पामध्येही पाणीसाठा उपलब्ध झाला नाही .यामुळे येणार्या काळात सिद्धेश्वर धरणावर अवलंबून असलेल्या अनेक गावांमधून पिण्याच्या पाण्याचे व सिंचनाचे भयावहा संकट उभे राहणार. अर्धा पावसाळा संपला असला तरी येणार्या दोन महिन्यात पाऊसमान सरासरीपेक्षा जास्त झाल्यास भविष्यातील पाणीटंचाई निर्माण होणार नाही आणि पीक परिस्थिती सुद्धा सुधारणा होऊन शेतकर्याचे चांगभले होईल.
सिद्धेश्वर धरणात ३२ टक्केच जलसाठा; भविष्यात पाण्याच्या सिंचनाचे संकट घोगांवणार
Siddheshwar Dam Water Storage: अर्धा पावसाळा संपला असून पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने पीक परिस्थिती चांगली असली तरी हिंगोली जिल्ह्यासह औंढा नागनाथ तालुक्यात भविष्यात सिंचन
Siddheshwar Dam Water Storage
संबंधित सामग्री
माणसांसोबत वन्यजीवांनाही दुष्काळाची झळ; पाण्याच्या शोधात वानरांची गावोगावी भटकंती
Wildlife Drought: यंदाच्या पावसाच्या लहरीपणामुळे या परिसरालाही दुष्काळाची तीव्र झळ बसली आहे. त्याचा परिणाम केवळ शेतकरी आणि शेतीवरच नव्हे, तर जंगल परिसरातील वानरांसह विविध वन्यप्राणी व पक्ष्यांवरही..
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय
अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू
Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?
एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’
बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.