“सर्व व्यवहार पती करत होते” — कल्पना खरातचा बचाव पक्षाचा दावा; अटकपूर्व जामीनावर न्यायालयात युक्तिवाद

भोंदूबाबा अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात ३१ मार्चपासून फरार असून, तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता न्यायालयात सुनावणी पार पडली.

“सर्व व्यवहार पती करत होते” — कल्पना खरातचा बचाव पक्षाचा दावा; अटकपूर्व जामीनावर न्यायालयात युक्तिवाद

Ashok Kharat Case

नाशिक (Ashok Kharat Case) : भोंदूबाबा अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात ३१ मार्चपासून फरार असून, तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणात अशोक खरात यांच्या कथित गैरप्रकारांमध्ये पत्नी कल्पना खरात हिचाही सहभाग असल्याचे आरोप समोर आले आहेत. बँक व्यवहार आणि जमीन व्यवहारांशी संबंधित घोटाळ्यांमध्ये तिची भूमिका असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर कल्पना खरात हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान तिचे वकील ॲड. प्रशांत गिरी यांनी न्यायालयात युक्तिवाद करत, कल्पना खरातचा कोणत्याही व्यवहारात थेट सहभाग नसल्याचे सांगितले. तिच्या नावावरील सर्व बँक खाती तिचे पती अशोक खरातच हाताळत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे केवळ खात्यातून व्यवहार झाले म्हणून तिला आरोपी धरता येणार नाही, असा त्यांचा दावा होता.

बचाव पक्षाचा युक्तिवाद
ॲड गिरी यांनी मांडले की, फिर्यादीने दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल केला असून, अशोक खरात यांच्यावर गुन्हे नोंदवले गेल्यानंतरच जुन्या व्यवहाराचा फायदा मिळवण्यासाठी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. जमीन व्यवहारानंतर जवळपास वर्षभर फिर्यादीने कोणतीही न्यायालयीन दाद मागितली नव्हती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच, कोणत्याही व्यवहारावेळी कल्पना खरात उपस्थित नव्हती, हे फिर्यादीच्या एफआयआरमध्येही नमूद असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, कल्पना खरातने कधीही व्याजाची मागणी केलेली नाही, तसेच तिच्यावर यापूर्वी फसवणुकीचे कोणतेही गुन्हे नोंदलेले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

सरकारी पक्षाचे प्रत्युत्तर
सरकारी वकील बी. डी. पानगव्हाणे यांनी बचाव पक्षाच्या युक्तिवादाला विरोध करत म्हटले की, व्यवहार कल्पना खरात यांच्या खात्यांतून झाले असल्याचे स्वतः आरोपी मान्य करत आहेत. जमीन खरेदीसंबंधित कागदपत्रांवर तिची सही आणि अंगठा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुखत्यारपत्र तयार करताना ती स्वतः उपस्थित होती आणि व्याजदर ठरवण्यातही तिचा सहभाग होता, असा दावा सरकारी पक्षाने केला. तसेच, जर सर्व व्यवहार पती करत होते, तर त्याविरोधात तिने तक्रार का दाखल केली नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

तपास अधिकाऱ्यांची माहिती
तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, कल्पना खरात यांच्या खात्यांमधून सुमारे सात कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. ती कोणत्याही नोकरीत नसताना एवढ्या मोठ्या व्यवहारांची नोंद कशी झाली, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला.

याशिवाय, खरात दाम्पत्याच्या मालमत्तेमध्ये कल्पना खरातचा ४० टक्के हिस्सा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अशोक खरात यांच्या व्यवहारांची तिला पूर्ण माहिती होती, असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे; रुपाली चाकणकर यांच्या जागी मिळाली महत्त्वाची जबाबदारी

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे; रुपाली चाकणकर यांच्या जागी मिळाली महत्त्वाची जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आता वैशाली नागवडे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

Aug 05, 2026
कर्जमुक्ती योजनेत घोळ, बँक खात्यातील आणि यादीतील रक्कमेत मोठी तफावत!   

कर्जमुक्ती योजनेत घोळ, बँक खात्यातील आणि यादीतील रक्कमेत मोठी तफावत!   

Farm Loan Waiver Scheme: ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या यादीतील कर्ज रक्कम आणि बँक खात्यात जमा होणाऱ्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत

Jul 29, 2026
एसआयटी करणार  का उच्चपदस्थ नेत्यांची चौकशी?

एसआयटी करणार का उच्चपदस्थ नेत्यांची चौकशी?

नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या कथित भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असून, या प्रकरणावरून आता आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण चांगलेच तापले आहे.

Apr 06, 2026
SIT च्या रडारवर ‘ती’ अधिकारी! खरात प्रकरणात धक्कादायक लिंक उघड

SIT च्या रडारवर ‘ती’ अधिकारी! खरात प्रकरणात धक्कादायक लिंक उघड

नाशिकमधील कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे तपशील समोर येत असून तपासाची व्याप्ती अधिकच वाढताना दिसत आहे.

Apr 06, 2026
“इतके कॉल्स का?” भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी राजकीय नावे चर्चेत

“इतके कॉल्स का?” भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी राजकीय नावे चर्चेत

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून या प्रकरणाची पोहोच केवळ गुन्हेगारीपुरती मर्यादित नसून राजकीय व प्रशासकीय पातळीपर्यंत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Apr 03, 2026