अशोक कांबळे मृत्यू

अनुराधा पतसंस्थेच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक कांबळे यांचा परभणी कारागृहात मृत्यू

Ashok Kamble Death: अनुराधा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष अशोक कांबळे यांचा परभणी कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कांबळे यांच्यावर 6 कोटी रुपयांचा अपहाराचा आरोप होता.

अनुराधा पतसंस्थेच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक कांबळे यांचा परभणी कारागृहात मृत्यू

Ashok Kamble Death)

हिंगोली (Ashok Kamble Death) : अनुराधा  अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. हिंगोली  या पतसंस्थेतील ६ कोटी २७ लाख  रुपयाच्या  अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक वामनराव कांबळे हे परभणी कारागृहात  न्यायालयीन कोठडीत होते. रविवारी दुपारच्या सुमारास कारागृहात त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त  झाली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी  की, हिंगोली शहरातील अनुराधा अर्बन को-ऑप क्रेडित सोसायटी लि. शाखेमध्ये अध्यक्ष  व संचालक मंडळाने २४ डिसेंबर २०१९ ते २४ फेब्रुवारी २०२४ या दरम्यानच्या कालावधीत ४०३८ ठेवीदारांनी गुंतवणुक केलेल्या  ६ कोटी २७ लाख ६५ हजार  १३० रुपयाच्या अपहार प्रकरणात लेखापरीक्षक अनिल पाराप्पा  बंधू यांनी हिंगोली  शहर  पोलिस ठाण्यात ३ मे २०२४ रोजी दिलेल्या  फिर्यादीवरून पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक वामनराव कांबळे  (५८) रा. गोपाल टॉकीज जवळ वाशिम यांच्यासह संचालक मंडळ  व कर्मचार्‍यावर फसवणुकीचा गुन्हा  दाखल करण्यात आला होता. या (Ashok Kamble Death) गुन्ह्याचा  तपास हिंगोलीच्या आर्थिक  गुन्हे  शाखेकडे  सोपविण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी पतसंस्थेचा  अध्यक्ष अशोक  कांबळे  यांना  जुलै २०२४ रोजी अटक  करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना  काही दिवस पोलिस  कोठडी सुनावली होती.

कालांतराने गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर कांबळे  यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची परभणी कारागृहात रवानगी करण्यात आली होती. कांबळे  हे परभणी कारागृहात ९ ऑगस्ट २०२४ रोजी दाखल झाले  होते. ३ मे  रोजी अचानक त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना कारागृह प्रशासनाने तात्काळ  परभणीच्या शासकीय रुग्णालयात  उपचारासाठी हलविले. डॉक्टरांनी  त्यांना तपासल्यानंतर  दुपारी १.१८ वाजता मृत घोषीत केले. हा (Ashok Kamble Death) मृत्यू हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने झाला असल्याचे प्रशासनाने  सांगितले. या प्रकरणात पंचनामा  करण्याची प्रक्रिया कारागृहात प्रशासनाने सुरु  केली  होती. मयत अशोक कांबळे यांचे शवविच्छेदन ४ मे सोमवार रोजी होणार असून त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात येणार  आहे.

संबंधित सामग्री

पंजाबी गायक बलजीत सिंह यांचा घरात मृतदेह; पोस्टमार्टममध्ये मृत्यूचे कारण स्पष्ट

पंजाबी गायक बलजीत सिंह यांचा घरात मृतदेह; पोस्टमार्टममध्ये मृत्यूचे कारण स्पष्ट

​​​​​​​पंजाबी संगीत क्षेत्राला हादरवणारी घटना समोर आली आहे.

Sep 04, 2026
परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

Parbhani Financial Fraud: लेखा व कोषागार कार्यालयातून चार वेळा अधिकची घेतलेली एरीयसची रक्कम वेग वेगळया तारखेला कनिष्ठ लिपीकाने व्ययक्तीक खात्यावर घेऊन आर्थिक लाभ मिळवत शासनाची फसवणुक

Aug 13, 2026
घरकुल योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करा

घरकुल योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करा

Gharkul Yojana: घरकुल योजनेत लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून पंचायत समिती मधील बांधकाम विभागाच्या काही अधिकारी यांनी एजंट च्या माध्यमातून घरकुलाचे पेमेंट टाकण्यासाठी पैशाची मागणी

Aug 03, 2026
वसमत पंचायत समितीतील कंत्राटी अभियंत्याची परभणी कारागृहात रवानगी

वसमत पंचायत समितीतील कंत्राटी अभियंत्याची परभणी कारागृहात रवानगी

लाभार्थ्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वसमत पंचायत समितीतील कंत्राटी अभियंता गणेश बप्पासाहेब गुजर यांची परभणी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Jul 13, 2026
श्रीराम मंदिर चंदा चोरी विरोधात, काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह

श्रीराम मंदिर चंदा चोरी विरोधात, काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह

Nanded Congress Satyagraha: नांदेडमधील महावीर चौकवर काँग्रेसेवकांनी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह केले. ते श्रीराम मंदिराच्या करोडो रुपयांच्या चंडाळीच्या विरोधात आले आहेत.

Jul 10, 2026