Anushka Chougule

पुण्यातील १८ वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; NEET निकालानंतर टोकाच्या निर्णयाची शक्यता, पोलिसांचा तपास सुरू

पुण्यातील काळेपडळ परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यातील १८ वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; NEET निकालानंतर टोकाच्या निर्णयाची शक्यता, पोलिसांचा तपास सुरू

Anushka Chougule

काळेपडळ परिसरातील घटना; आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही, NEET परीक्षेतील गुणांशी संबंध आहे का याचाही तपास

पुण्यातील काळेपडळ परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. १८ वर्षीय अनुष्का चौगुले हिचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरामध्ये ती मृतावस्थेत आढळली. तिच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

प्राथमिक तपासात, नुकताच जाहीर झालेल्या NEET UG 2026 परीक्षेच्या निकालातील अपेक्षेपेक्षा कमी गुणांमुळे ती मानसिक तणावाखाली होती का, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निष्कर्ष समोर आलेले नाहीत. त्यामुळे मृत्यूचे निश्चित कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर केला. निकालासोबत अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key), गुणवंतांची यादी आणि विविध प्रवर्गांचा कट-ऑफ देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

यंदाच्या परीक्षेत आर्यन गुप्ता आणि पांशुल बन्सल यांनी 720 पैकी 715 गुण मिळवत संयुक्तपणे देशात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 19 विद्यार्थ्यांनी 700 पेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

NTA ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 690 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या 138 विद्यार्थ्यांपैकी सुमारे 93 टक्के विद्यार्थ्यांनी NEET-UG परीक्षा प्रथमच दिली होती. यंदा देशभरातून 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

निकालाच्या आकडेवारीनुसार, एकूण 11.21 लाख उमेदवार पात्र ठरले, त्यापैकी 58 टक्क्यांहून अधिक महिला उमेदवार होत्या. यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचे यश विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक राहिले. परीक्षेत 57 टक्क्यांपेक्षा अधिक महिला उत्तीर्ण झाल्या, तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 55 टक्के इतके नोंदविण्यात आले.

दरम्यान, पुण्यातील या प्रकरणात पोलिसांकडून सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असून, तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026