माजी आमदार राहुल बोंद्रे व रामकृष्ण परमहंस मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल

नगर परिषद, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्वतंत्र तक्रारी दाखल केल्यानंतर चिखली पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे नोंदविले आहेत.

माजी आमदार राहुल बोंद्रे व रामकृष्ण परमहंस मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल

Anuradha Engineering College

अनुराधा अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या कथित बनावट कागदपत्र प्रकरणी कारवाई; राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

चिखली (Anuradha Engineering College) : चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा रामकृष्ण परमहंस मौनीबाबा शिक्षण संस्था, चिखलीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे आणि संस्थेच्या विश्वस्तांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय व अनुराधा पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी आणि मान्यतेसाठी वापरण्यात आलेल्या काही दस्तऐवजांच्या पडताळणीत कथित अनियमितता आढळून आल्याच्या तक्रारींवरून ही कारवाई करण्यात आली आहे. नगर परिषद, पंचायत समिती आणि तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्वतंत्र तक्रारी दाखल केल्यानंतर चिखली पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे नोंदविले आहेत.

या प्रकरणातील तक्रारदारांमध्ये नगर परिषद चिखलीच्या नगररचना सहाय्यक कांचन हिरामण राठोड, पंचायत समिती चिखलीचे विस्तार अधिकारी नितीन विजय शेळके आणि तहसील कार्यालय चिखलीचे मंडळ अधिकारी भगवान लक्ष्मण पवार यांचा समावेश आहे.

तक्रारीनुसार, मौजे अनुराधानगर (साकोगाव रोड), चिखली येथील गट क्रमांक ११७, ११८ व १४१ मधील अनुराधा अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयांच्या मान्यतेसाठी वापरण्यात आलेल्या काही प्रमाणपत्रांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार पडताळणी करण्यात आली. यामध्ये बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, जमीन वापर प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक दस्तऐवजांच्या सत्यतेची तपासणी करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी, बुलढाणा यांनी केलेल्या चौकशी अहवालानुसार काही प्रमाणपत्रे संबंधित कार्यालयांच्या अभिलेखांमध्ये उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही दस्तऐवजांच्या निर्गमनाची नोंद उपलब्ध नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले असून, याबाबत सविस्तर चौकशी करण्यात आली होती.

तहसील कार्यालयाच्या तक्रारीनुसार, संस्थेच्या विश्वस्तांनी कथितरीत्या बनावट दस्तऐवज तयार करून ते खरे असल्याचे भासवत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्ली यांच्याकडे सादर केले आणि त्याआधारे महाविद्यालयांना मान्यता प्राप्त केली. या प्रक्रियेमुळे शासन आणि संबंधित कार्यालयांची फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये भारतीय दंड संहितेतील कलम ४२० (फसवणूक), ४६५ (बनावट कागदपत्र तयार करणे), ४६७ (मूल्यवान दस्तऐवजाची बनावट निर्मिती), ४६८ (फसवणुकीसाठी बनावट कागदपत्र तयार करणे), ४७१ (बनावट कागदपत्राचा वापर) आणि १२०(ब) (कट रचणे) यांचा समावेश आहे.

एफआयआरमधील माहितीनुसार, कथित गैरव्यवहाराचा कालावधी १ जानेवारी १९९२ ते ३० जून २०२४ तसेच त्यानंतरचा कालावधी असा नमूद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार संबंधित विभागांनी चौकशी करून पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या.

विशेष म्हणजे, एका माजी आमदाराशी संबंधित शैक्षणिक संस्थेविरोधात एकाच दिवशी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्याने जिल्हाभर चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय नितीन चौहान व चिखली पोलीस करीत आहेत.

दरम्यान, गुन्हे दाखल झाल्यामुळे राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026