गॅस पुरवठ्यावर प्रशासनाची नजर; तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ९ पथके सक्रिय

आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असताना वर्धा जिल्ह्यात कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

गॅस पुरवठ्यावर प्रशासनाची नजर; तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ९ पथके सक्रिय

वर्धा (Anti Black Market): आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असताना वर्धा जिल्ह्यात कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने ९ विशेष पथके गठीत केली असून गॅस पुरवठा व वितरणावर काटेकोर लक्ष ठेवले जात आहे.

जिल्ह्यात दररोज सुमारे ५ हजार घरगुती गॅस सिलिंडरची मागणी असताना सध्या अंदाजे ४५०० सिलिंडरचा पुरवठा होत आहे. या तफावतीमुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण होत असल्या तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत पथकांकडून अनधिकृत साठा जप्त करण्यात येत आहे. तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वापरावरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यात १९ किलोचे २७५ आणि ५ किलोचे १७३ व्यावसायिक सिलिंडर नोंदणीकृत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

गॅस वितरण प्रक्रियेत ऑनलाइन बुकिंग सक्तीचे करण्यात आले असून त्याशिवाय एजन्सीकडून सिलिंडर देण्यात येत नाही. यामुळे काही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यातील ग्राहकसंख्येचा विचार करता इंडियन ऑइलचे आणि १,३०,५३४, एचपीसीएलचे २,३५,१०३ बीपीसीएलचे ३०,८८२ ग्राहक आहेत.

प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जिल्ह्यात गॅसचा पुरवठा समाधानकारक असून अफवांवर विश्वास ठेवू नये. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे अटकेत

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे अटकेत

सोशल मीडियावर एका समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे यांना वर्धा पोलिसांनी अटक केली आहे.

Aug 27, 2026
स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, हिंगणघाट शहरात शोककळा

स्वातंत्र्यदिनी भीषण अपघात; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू, हिंगणघाट शहरात शोककळा

 एकीकडे सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असतानाच हिंगणघाट शहरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली.

Aug 15, 2026
एफडीएची कारवाई बेकायदेशीर; गोरस भंडाराला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दिलासा

एफडीएची कारवाई बेकायदेशीर; गोरस भंडाराला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दिलासा

अस्वच्छतेच्या कारणावरून ३१ मे रोजी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) यांनी गोरस भंडारावर केलेली बंदीची कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे.

Jul 07, 2026
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये बदल

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये बदल

PM Ujjwala Yojana: लाभार्थ्यांना वर्षाला 9 वरच 4 सिलेंडरवर 300 रुपये अनुदान मिळणार. 14.2 किलो सिलेंडरचे दर 29 रुपये वाढले. तेल कंपन्यांना 700 रुपये तोटा होतो. 10.5 कोटी गरीब कुटुंबांच्या खिशावर परिणाम

Jun 09, 2026