Anganwadi

अंगणवाडी पोषण आहारावर गंभीर प्रश्न; '10 शिट्या झाल्या तरी वाटाणा शिजत नाही', सेविकेची तुकाराम मुंढेंकडे थेट मागणी

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अंगणवाडी पोषण आहारावर गंभीर प्रश्न; '10 शिट्या झाल्या तरी वाटाणा शिजत नाही', सेविकेची तुकाराम मुंढेंकडे थेट मागणी

Anganwadi

देवयानी पारधी यांचा व्हिडिओ व्हायरल; निकृष्ट दर्जाच्या कच्च्या मालामुळे बालपोषणावर परिणाम होत असल्याचा आरोप

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत पोषण आहारासाठी मिळणाऱ्या कच्च्या मालाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

देवयानी पारधी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये अंगणवाड्यांना प्रशासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या साहित्याबाबत अनेक मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, भरडा, साखर, पांढरे वाटाणे, मूगडाळ, तांदूळ, हळद आणि खाद्यतेल यांसारखा कच्चा माल अंगणवाड्यांना पुरविला जातो. मात्र, त्यातील पांढरा वाटाणा दर्जाहीन असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

त्यांनी सांगितले की, पांढरा वाटाणा एक दिवस आधी पाण्यात भिजवून ठेवला आणि कुकरमध्ये 9 ते 10 शिट्या दिल्यानंतरही तो पूर्णपणे शिजत नाही. शिजवल्यानंतरही तो कडक आणि कच्चाच राहतो. अशा अवस्थेतील अन्न लहान मुलांना देताना मनाला वाईट वाटते, मात्र उपलब्ध साहित्यामुळे दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी नमूद केले.

लापशी तयार करण्यासाठी मिळणाऱ्या भरड्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भरडा कितीही वेळ शिजवला तरी तो पूर्णपणे मऊ होत नाही. तसेच प्रशासनाकडून 1 किलो भरड्यासाठी केवळ पाव किलो साखर दिली जात असल्याने लापशीला अपेक्षित गोडवा राहत नाही. त्यामुळे अंगणवाडीत उत्साहाने येणाऱ्या लहान मुलांचा हिरमोड होत असल्याचे त्यांनी सांगितले.

देवयानी पारधी यांनी मुलांच्या आरोग्याचाही मुद्दा उपस्थित केला आहे. "आम्ही या चिमुकल्यांची स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेतो. मात्र निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे त्यांचे वजन वाढण्याऐवजी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अशा आहाराचा नेमका उपयोग काय?" असा प्रश्न त्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला आहे.

या प्रकरणी त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना थेट आवाहन करत निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारावर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे. हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत हा मुद्दा पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026