आंध्र प्रदेश भाविक ठार

वाहनाच्या धडकेत आंध्र प्रदेशातील भाविक ठार

Andhra Pradesh Devotees Death: औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर गुंडा पाटी जवळ एका भाविकाला भरधाव वाहनाने धडक दिली. यामध्ये व्यंकटेश्वरा नागनाथ गच्चे यांचा मृत्यू झाला.

वाहनाच्या धडकेत आंध्र प्रदेशातील भाविक ठार

Andhra Pradesh Devotees Death

औंढा ना. - परभणी मार्गावर गुंडा पाटी जवळील घटना

हट्टा (Andhra Pradesh Devotees Death) : औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर गुंडा पाटीनजीक भरधाव वाहनाच्या धडकेने आंध्र प्रदेशातील एका भाविकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात २२ एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh Devotees Death) काही भाविक एका टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हर्ल्स कंपनीव्दारे १२ ज्योर्तिलिंगाच्या दर्शनाकरीता मागील काही दिवसापूर्वी निघाले होते. या भाविकांनी उज्जैन, प्रयागराज यासह इतर देवस्थानाचे दर्शन घेऊन २१ एप्रिल रोजी मंगळवारी श्रीक्षेत्र औंढा नागनाथाचे दर्शन रात्रीच्या वेळी घेतले. यानंतर हे भाविक परळी वैजनाथकडे निघाले होते. २२ एप्रिलला रात्र झाल्याने त्यांनी वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात मुक्काम ठोकला. बुधवारी पहाटेच्या सुमारास व्यंकटेश्वरा नागनाथ गच्चे (६२) रुद्रपेठ बायपास, अनंतपुर (आंध्र प्रदेश) हे लघुशंकेकरीता उठले असता रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने जाणार्‍या वाहनाने त्यांना धडक दिली.

यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले. अपघाताची माहिती हट्टा ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांना मिळताच त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.  जखमी व्यंकटेश्वरा यांना हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना मृत घोषित केले.  या प्रकरणी हट्टा पोलिसात प्रकाश एकबोटे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोउपनि युवराज गवळी हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

Chondiamba Armed Attack Death: वसमत तालुक्यातील चोंडी आंबा टी-पॉईंटवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात ६ ऑक्टोबर मंगळवार रोजी धारदार शस्त्राने हल्ला

Oct 06, 2026
अविनाश बांगरच्या शौर्याचा शेवट; दुसर्‍यासाठी जीव दिला: स्वत काळाच्या पडद्या आड गेला

अविनाश बांगरच्या शौर्याचा शेवट; दुसर्‍यासाठी जीव दिला: स्वत काळाच्या पडद्या आड गेला

Avinash Bangar's death: हिंगोली येथे फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगी अविनाश काशिनाथ बांगर यांनी दुसर्‍यांचे प्राण वाचवण्यासाठी धाव घेतली आणि या प्रयत्नातच त्यांनी स्वतःचा प्राण गमावला.

Oct 06, 2026
सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

सिगारेट ओढणाऱ्यांपासून सावध! ‘स्मोकर’जवळ थांबणेही धोकादायक...

India Smoking Deaths: सिगारेट ओढणारी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याला धोका निर्माण करतेच; मात्र तिच्या आसपास असलेल्या धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

Oct 06, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026