अमोल इंगळे गृहपाल

अमोल इंगळे यांची गृहपाल पदावर निवड; शेलूद गावात जल्लोषात स्वागत

Amol Ingle: अमोल इंगळे यांनी सातत्यपूर्ण परिश्रमाने सरकारी सेवा भरतीतून एस-१४ श्रेणीत आदिवासी विकास विभागात गृहपाल पदावर निवड मिळवली.

अमोल इंगळे यांची गृहपाल पदावर निवड; शेलूद गावात जल्लोषात स्वागत

Amol Ingle

 

ग्रामस्थांकडून बैलगाडीतून मिरवणूक; युवकांनी अमोलचा आदर्श घ्यावा – आ. श्वेताताई महाले पाटील

चिखली (Amol Ingle) : आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणे अत्यंत कठीण बनले असताना चिखली तालुक्यातील शेलूद येथील अमोल गजानन इंगळे यांनी सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर सरळ सेवा भरतीतून एस-१४ श्रेणीत आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहात गृहपाल पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे शेलूद गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.

अमोल इंगळे (Amol Ingle) यांच्या निवडीच्या आनंदात ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरवणूक काढली. ढोल-ताशांच्या गजरात व गुलाल उधळत गावातून स्वागत सोहळा पार पडला. या मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चिखली शहराची आराध्य दैवत असलेल्या रेणुका मातेच्या यात्रोत्सवात इंगळे परिवाराकडून देवीला पहिले मानाचे पातळ अर्पण करण्यात येते. त्या परंपरागत धार्मिक व सामाजिक वारसा लाभलेल्या परिवारातील अमोल इंगळे यांनी मिळवलेल्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दरम्यान, २४ मे २०२६ रोजी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी अमोल यांचे वडील गजानन इंगळे व आई सखुबाई इंगळे यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी “ग्रामीण भागातील युवकांनी अमोल इंगळे यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर यश संपादन करावे,” असे आवाहन केले.
याच दिवशी रेणुका देवीची पातळ व वगडी नेण्यात येणाऱ्या नादुरुस्त रस्त्याच्या कामाचे उद्घाटनही आमदार महाले यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मार्गाच्या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ भाजप नेते सुरेशआप्पा खबुतरे, सरपंच मंगेश इंगळे, गोपाल आप्पा शेटे, पत्रकार गोपाल तुपकर, विजयसिंग गाडेकर, संतोष नाना इंगळे, सरपंच सुनील चिंचोले, संतोष इंगळे, राजू इंगळे, समाधान वाघमारे, नितीन पाटील, नगरसेवक दीपक वाधवाणी, सुभाष खरात, ज्ञानेश्वर मोरे, ज्ञानेश्वर इंगळे, विजय वायकोस, गोपाल नवले, रामेश्वर इंगळे, राजेश इंगळे, संजय इंगळे, भारत केसकर, अमोल नवले, श्रीकांत केसकर, नारायण इंगळे, विशाल इंगळे, दिलीप केसकर, दीपक कदम, उमेश जांभळे, सदानंद शेळके, मोसीम बागवान, गफार बागवान, राजू पठाण, कदीर शेख, भारत सवडे, नितीन सावंत, विराट शेळके, विष्णू शेळके, त्र्यंबक शेळके, अमोल भंडारे, उमेश इंगळे, शुभम इंगळे, दत्तात्रय इंगळे, गोविंदा इंगळे, राम केसकर यांच्यासह शेलूद गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026