अकोला दरोडा आरोपी

दरोडा टाकणारे चार आरोपी अकोला येथून अटक

Akola robbery accused: अकोल्यात चार आरोपी जाहित केले गेले आहेत, ज्यांनी अमरावतीपासून बडनेरा-लोणी मार्गावर दुचाकीचे चाव काढून आणि त्यावर लुटमारी केली होती.

दरोडा टाकणारे चार आरोपी अकोला येथून अटक

Akola robbery accused

 

गुन्हेशाखेची कारवाई; बडनेरा-लोणी मार्गावर टाकला होता दरोडा

अमरावती (Akola robbery accused) : दुचाकीने जाणार्‍या इसमाच्या चालत्या गाडीची चावी काढून  लुटमार करणार्‍या चार आरोपींना स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने  अकोला येथून अटक केली आहे. पोलिसांनी ही कारवाई ९ ऑगस्टरोजी पार पाडली.

४ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादी सुनील एकनाथराव अजमिरे (५५) हे जहांगीरपूर येथे त्यांच्या शेतामध्ये दुचाकी क्र. एमएच  २७/ डीएन ४८६२ ने सकाळी ७ वाजता अमरावती येथून  जात असताना बडनेरा - लोणी मार्गावरील बेलोरा गावाच्या समोर व्हीजेव्ही फॉर्मनजीक चार अनोळखी व्यक्तींनी अजमिरे यांच्या चालत्या दुचाकीची चावी काढून  त्यांच्या शर्टाच्या खिशातील मोबाईल काढला. तसेच गाडीची चावी शेतामध्ये दूर फेकून दिली. नंतर खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. या घटनेची तक्रार सुनील अजमिरे यांनी लोणी पोलिसांत दाखल केली असता पोलिसांनी त्या अज्ञात आरोपींविरुध्द कलम ३०९, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

गुन्हेशाखेचे पथक या (Akola robbery accused) गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना ९ ऑगस्टरोजी पोलिसांना गोपनीय व खात्रीशीर माहिती मिळाली की, लोणी मार्गावरील ही जबरी चोरी खडकी  अकोला येथे राहणारा रितेश महापात्रा याने त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन केली. या माहितीवरून गुन्हेशाखेचे पथक अकोला येथे रवाना झाले. तेथे आरोपी रितेश महापात्रा हा त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन रेल्वेस्टेशन परिसरात फिरत आहे, असे समजले असता पोलिसांनी तेथे जावून त्याचा शोध घेतला. तेव्हा तो  रेल्वेस्टेशन परिसरातील ऑटो पार्विंâगजवळ संशयितरित्या फिरताना दिसून आला. पोलिसांनी त्याला तेथेच ताब्यात घेऊन विचारपूस केली. 

तेव्हा त्याने सोबत  असलेला साथीदार गौरव विनोद डोंगरे (१९) रा. खडकी अकोला, श्रेयस उमेश इंगळे (२०) रा. कान्हेरी ता. अकोला तसेच एक विधीसंघर्षित बालक यांची नावे सांगितली. या (Akola robbery accused) आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर रितेश महापात्रालासुध्दा विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने ४ ऑगस्टरोजी त्याच्या साथीदारांसह फिर्यादी सुनील अजमिरे यांना लुटल्याचा कसा प्लॅन तयार केला, हा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. आरोपींनी अजमिरे यांच्याजवळील पोलिसांनी हिसकावून घेतलेली रक्कम गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्र. एमएच ३०/ बीवाय २४८० किंमत अंदाजे ५५ हजार रुपये, ३ मोबाईल किंमत अंदाजे ४५ हजार रुपये, १ पॉवर बँक असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चारही आरोपींना लोणी पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांंच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक रोहित कुदळे, अंमलदार सुधीर बावणे, गजेंद्र ठाकरे, सचिन गायधने, रवींद्र वर्‍हाडे, नीलेश डांगोरे, श्याम गावंडे, वाहनचालक संजय प्रधान तसेच सायबरचे प्रवीण अंबाडकर व गुणवंत शिरसाट यांनी केली.

संबंधित सामग्री

अमरावतीत १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची भरचौकात हत्या; एकतर्फी प्रेमातून हल्ल्याचा संशय

अमरावतीत १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची भरचौकात हत्या; एकतर्फी प्रेमातून हल्ल्याचा संशय

अमरावती शहरात १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

Sep 03, 2026
अमरावती मध्ये कबूतर चोरीच्या वादातून दोन जिवलग मित्रांच्या हत्येप्रकरणी वलगावचे सरपंच अटकेत; ७ आरोपींना बेड्या

अमरावती मध्ये कबूतर चोरीच्या वादातून दोन जिवलग मित्रांच्या हत्येप्रकरणी वलगावचे सरपंच अटकेत; ७ आरोपींना बेड्या

अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे दोन जिवलग मित्रांच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत वलगावचे सरपंच सुधीर उगले यांच्यासह सात आरोपींना अटक केली आहे.

Jul 21, 2026
पाण्याच्या टाकीत सापडलेल्या मृतदेह प्रकरणात दोन आरोपी जेरबंद

पाण्याच्या टाकीत सापडलेल्या मृतदेह प्रकरणात दोन आरोपी जेरबंद

Amravati Murder Case: आमावटी नागपुरी गेटची पाण्याची टाकीमध्ये जिर्ण अवस्थेत मृतदेह आढळला. डोणारोपींना ताब्यात घेऊन खुनीच्या गुन्ह्यामध्ये सहभाग उघड केला. नसरीन बानो व शेख इकराम

Jun 17, 2026
तडीपार सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त

तडीपार सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त

Amravati Illegal Weapons: अमरावती शहरात गुन्हे शाखेच्या कारवाऱ्यामुळे अवैध कट्टा (पिस्टल) व जिवंत काडतेसह एका गुन्हेगारावर दबदबा पडला. तडीपार करण्यात आलेल्या आरोपीलाचं शस्त्र जप्त

Jun 16, 2026
परभणीत निवडणुकीच्या भांडणातून जीवघेणा हल्ला

परभणीत निवडणुकीच्या भांडणातून जीवघेणा हल्ला

Parbhani fatal attack: परभणीत पूर्णा ते चुडावा रोडवर १३ मे दुपारी गैरकायद्याच्या मंडळीने साक्षीदारांची दुचाकी थांबवून श्लील हल्ले करून जीवघेणा प्रयत्न केले. आरोपींचा गुन्हा दाखल झाला.

May 19, 2026