अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांचे निराकरण संवाद, पारदर्शकता आणि संस्थात्मक सुधारणांतून व्हावे; हिंसक संघर्ष दुर्दैवी

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad: जंतर-मंतर येथे नीट-यूजी आंदोलनादरम्यान निर्माण झालेली अराजकता, स्वतःला विद्यार्थी म्हणवणाऱ्या काही अराजक प्रवृत्तीच्या व्यक्ती आणि सुरक्षा दलांमध्ये झालेला हिंसक

विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांचे निराकरण संवाद, पारदर्शकता आणि संस्थात्मक सुधारणांतून व्हावे; हिंसक संघर्ष दुर्दैवी

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad

 

स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता व संस्थात्मक सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करावी: अभाविप

संकुचित राजकीय स्वार्थ व राष्ट्रविरोधी कटकारस्थानांचे माध्यम विद्यार्थी होणार नाहीत: अभाविप

हिंगोली (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जंतर-मंतर येथे नीट-यूजीसह विविध शैक्षणिक विषयांवर आयोजित आंदोलनादरम्यान निर्माण झालेली अराजकता, स्वतःला विद्यार्थी म्हणवणाऱ्या काही अराजक प्रवृत्तीच्या व्यक्ती आणि सुरक्षा दलांमध्ये झालेला हिंसक संघर्ष तसेच राजधानी दिल्लीतील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे मानते. अभाविपचे मत आहे की विद्यार्थ्यांच्या न्याय्य आंदोलनाच्या आड काही राजकीय स्वार्थी शक्ती आणि समाजविघातक घटकांनी अराजकता व हिंसा घडवून आणण्याचा प्रयत्न केला असून, अभाविप त्याचा तीव्र निषेध करते. या घटनांमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थी व सुरक्षा कर्मचाऱ्यांप्रती अभाविप संवेदना व्यक्त करते आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करते. विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांचे निराकरण केवळ विधायक संवाद, संवेदनशीलता आणि संस्थात्मक सुधारणांद्वारेच शक्य असल्याचे अभाविपचे मत आहे.

नीट-यूजीसह विविध स्पर्धा परीक्षांमधील अनियमिततेविरोधात अभाविप सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी अभाविपने सर्वप्रथम केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी केली होती. तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) मुख्यालयासमोर आंदोलन करून जबाबदारी निश्चित करण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. सन २०२४ पासून आजपर्यंत अभाविप नीट-यूजीच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करत आहे. त्यामुळे अभाविप भारत सरकारकडे मागणी करते की, स्पर्धा परीक्षांची शुचिता, पारदर्शकता आणि आवश्यक संस्थात्मक सुधारणांच्या सर्व पैलूंचा सखोल आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात यावी. या समितीने परीक्षा प्रणाली अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी ठोस व कालबद्ध शिफारसी सादर कराव्यात.

अभाविपचे (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) मत आहे की, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि न्याय्य मागण्यांचा वापर कोणत्याही संकुचित राजकीय स्वार्थासाठी, राष्ट्रविरोधी अजेंड्यासाठी किंवा देशात अस्थिरता, संघर्ष आणि अराजकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी होऊ नये. असे प्रयत्न ‘डीप स्टेट’सारख्या भारतविरोधी शक्तींना अप्रत्यक्ष बळ देणारे ठरतात. या शक्ती दीर्घकाळापासून भारताची अंतर्गत स्थिरता, अखंडता, सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय एकात्मता कमकुवत करण्याचा तसेच सामाजिक वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातील विद्यार्थी समुदाय जागरूक, राष्ट्रनिष्ठ आणि लोकशाही मूल्यांप्रती कटिबद्ध आहे. त्यामुळे तो कोणत्याही राजकीय दिशाभूल, बाह्य प्रभाव किंवा राष्ट्रविरोधी कटकारस्थानांचे माध्यम होणार नाही. अभाविप विद्यार्थ्यांना, युवकांना, पालकांना, शिक्षकांना, शिक्षणतज्ज्ञांना आणि समाजातील सर्व घटकांना आवाहन करते की, विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांना राजकीय चिथावणीपासून दूर ठेवून त्यांच्या समाधानासाठी सकारात्मक, शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने वातावरण निर्माण करण्यासाठी आपली भूमिका बजावावी तसेच राष्ट्रविरोधी कटकारस्थानांना बळी पडू नये.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंह सोळंकी म्हणाले, “नीट-यूजीसह विविध स्पर्धा परीक्षांमधील अनियमिततेमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. या न्याय्य प्रश्नांवर अभाविप सुरुवातीपासून विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभी आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना संकुचित राजकीय स्वार्थासाठी वळविण्याचा प्रत्येक प्रयत्न हा विद्यार्थी हिताच्या विरोधी आहे. विद्यार्थीशक्तीचा वापर कोणत्याही राजकीय अजेंड्यासाठी किंवा भारताची एकता, अखंडता आणि सामाजिक समरसता यांना बाधा आणणाऱ्या शक्तींच्या हितासाठी होऊ देता येणार नाही. असे प्रयत्न ‘डीप स्टेट’सारख्या भारतविरोधी यंत्रणांना अप्रत्यक्ष बळ देतात, ज्या भारताची अंतर्गत स्थिरता आणि सार्वभौमत्व कमकुवत करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांचे निराकरण केवळ विधायक संवाद, संवेदनशीलता आणि संस्थात्मक सुधारणांद्वारेच होऊ शकते. स्पर्धा परीक्षांची शुचिता, पारदर्शकता आणि आवश्यक संस्थात्मक सुधारणांचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी भारत सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, जेणेकरून परीक्षा प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि उत्तरदायी बनू शकेल.”

अभाविप (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) देवगिरीचे प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांवर संघर्ष करणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा लोकशाही अधिकार आहे. मात्र या आंदोलनांचा वापर राजकीय स्वार्थ, हिंसा किंवा राष्ट्रविरोधी अजेंड्यासाठी होणे अत्यंत दुर्दैवी आहे. नीट-यूजीसह सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शक, विश्वासार्ह आणि उत्तरदायी व्यवस्था उभी राहावी, यासाठी केंद्र सरकारने तातडीने उच्चस्तरीय समिती स्थापन करून आवश्यक संस्थात्मक सुधारणा कराव्यात. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण संघर्ष आणि संवादाच्या लोकशाही मार्गानेच व्हावे, हीच अभाविपची भूमिका आहे.”

संबंधित सामग्री

राहुल गांधी पळणारे नव्हे, भिडणारे नेते: हर्षवर्धन सपकाळ

राहुल गांधी पळणारे नव्हे, भिडणारे नेते: हर्षवर्धन सपकाळ

Rahul Gandhi: राहुल गांधी हे पळून जाणारे नव्हे, तर प्रश्नांना भिडणारे नेते आहेत. उलट संसदेत महत्त्वाच्या प्रश्नांवरील चर्चेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पळ काढत आहेत..

Aug 12, 2026
Anti Paper Leak Bill लोकसभेत मंजूर; पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्राचे मोठे पाऊल, गदारोळातही विधेयकाला हिरवा कंदील

Anti Paper Leak Bill लोकसभेत मंजूर; पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्राचे मोठे पाऊल, गदारोळातही विधेयकाला हिरवा कंदील

देशातील परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांवर अंकुश आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सादर केलेले 'एंटी पेपर लीक बिल' लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे.

Jul 29, 2026
गर्भवती बलात्कार पीडितेच्या गुन्हेगारांना समर्थन देणारे नवे शिक्षणमंत्री...

गर्भवती बलात्कार पीडितेच्या गुन्हेगारांना समर्थन देणारे नवे शिक्षणमंत्री...

Priyanka Gandhi On Pralhad Joshi: काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी सरकारच्या शिक्षण धोरणावर, पेपरफुटीवर आणि नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नियुक्तीवर जोरदार हल्ला, ज्यामुळे सभागृहात गदारोळ

Jul 28, 2026
गुजरातमध्ये BAMS पेपरफुटी?  शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

गुजरातमध्ये BAMS पेपरफुटी? शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Gujarat BAMS Paper Leak: NEET आणि उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटी (UTU) च्या बी.टेक सेमिस्टर परीक्षेचे पेपरफुटी प्रकरणानंतर आता गुजरातमध्येही BAMS सर्जरी-1 पेपरफुटी प्रकरण...?

Jul 27, 2026
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नव्या शिक्षणमंत्र्यांची घोषणा

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नव्या शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Education Minister Pralhad Joshi: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला. राष्ट्रपतींनी कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांनाही निर्देश दिले.

Jul 25, 2026