ग्रामपंचायत आमदरी ग्रामसभा

आमदरी (शिवनी) येथील रद्द झालेली ग्रामसभा तातडीने घेण्याची मागणी!

Aamdari Gram Panchayat: मनोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत आमदरी (शिवनी) येथे दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ग्रामसभा ग्रामस्थांची अपेक्षित उपस्थिती नसल्याने रद्द करण्यात आली.

आमदरी (शिवनी) येथील रद्द झालेली ग्रामसभा तातडीने घेण्याची मागणी!

Aamdari Gram Panchayat Gram Sabha

 

गटविकास अधिकारी यांना निवेदन

मानोरा (Aamdari Gram Panchayat Gram Sabha) : मनोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत आमदरी (शिवनी) येथे दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ग्रामसभा ग्रामस्थांची अपेक्षित उपस्थिती नसल्याचे कारण सांगून रद्द करण्यात आली होती. सदर ग्रामसभा रद्द झाल्यानंतर पुढील ग्रामसभेची तारीख ३ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्याचे सरपंचांनी सभेमध्ये सांगितले होते. मात्र आजपर्यंत त्या बाबत कोणतीही अधिकृत नोटीस जाहीर करण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला असुन तातडीने ग्रामसभा घ्यावी, असे निवेदन दि. ३ सप्टेंबर रोजी अरविंद चव्हाण यांच्या गटविकास अधिकारी यांना दिले आहे. 

याबाबत ग्रामसेवक यांच्याकडे माहिती विचारली असता, त्यांच्याकडून समाधानकारक माहिती देण्यात आली नाही. दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सभेच्या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी पुढील (Aamdari Gram Panchayat Gram Sabha) ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयाऐवजी आमदरी (शिवनी) गावातच घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी सरपंच यांनी ग्रामस्थांना पुढील ग्रामसभा गावात घेण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत त्याबाबत कोणतीही नोटीस किंवा निश्चित तारीख जाहीर करण्यात आली नाही.

ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील विविध विकासकामे, समस्या व ग्रामसभेने प्रस्ताव मांडून त्यावर चर्चा व निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु ग्रामसभा वेळेवर न घेतल्यामुळे ग्रामस्थांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे गटविकास अधिकारी साहेबांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामपंचायत आमदरी (शिवनी) यांना रद्द झालेली ग्रामसभा तातडीने घेण्याचे आदेश द्यावेत, तसेच ग्रामसभेची तारीख, वेळ व ठिकाण याबाबत ग्रामस्थांना योग्य ती पूर्वसूचना देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने ताला ठोको आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

२४ ऑगस्ट रोजी ग्रामसभा (Aamdari Gram Panchayat Gram Sabha) नियमानुसार ग्रामस्थांच्या उपस्थित सर्व विषय सुचीवर घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे. तरीही ग्रामस्थांची ग्रामसभा घेण्याची मागणी असल्यास पुन्हा घेऊ, अशी प्रतिक्रिया प्रस्तुत प्रतिनिधीने भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता लोकनियुक्त सरपंच गोविंद गोवर्धन चव्हाण यांनी दिली.

संबंधित सामग्री

दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

ताओ दाटेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पाहणी समितीने ५ सप्टेंबर, शनिवार रोजी पाहणी केली.

Sep 05, 2026
परभणीत महिला सरपंचाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी; दोन भावांविरुद्ध गुन्हा

परभणीत महिला सरपंचाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी; दोन भावांविरुद्ध गुन्हा

पूर्णा तालुक्यातील सोनखेड येथे ग्रामसभा सुरू असताना गोंधळ घालत महिला सरपंचाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे

Aug 28, 2026
ग्रामसभा ठरावाचे अहवाल सादर करताना ग्रामरोजगार सेवकाला चपलीने मारहाण; अट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

ग्रामसभा ठरावाचे अहवाल सादर करताना ग्रामरोजगार सेवकाला चपलीने मारहाण; अट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

ग्रामरोजगार सेवकाला चपलीने मारहाण करून जातीवाचक तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी मानोरा पंचायत समितीच्या शासकीय कार्यालयात घडली.

Aug 25, 2026
पुसेगावची ग्रामसभा अर्ध्यावरच तहकूब; ग्रामस्थांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नाराजी

पुसेगावची ग्रामसभा अर्ध्यावरच तहकूब; ग्रामस्थांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नाराजी

Pusegaon Gram Sabha: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात मंगळवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ग्रामसभा गावापासून दूरच्या ठिकाणी आयोजित केल्याने सुरुवातीपासूनच ग्रामस्थांमध्ये नाराजी

Aug 18, 2026
मौजे आन्वी येथे आजपासून ग्रामस्थांचे आमरण उपोषण; ई-क्लास जमिनीवरील पुनरतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मौजे आन्वी येथे आजपासून ग्रामस्थांचे आमरण उपोषण; ई-क्लास जमिनीवरील पुनरतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Aanvi Hunger Stike: शासकीय ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण हटवून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी आन्वी येथील हनुमान संस्थानसमोर आमरण उपोषण सुरू

Jul 13, 2026