मनोरा वाहन अपघात

आंबे घेऊन जाणारा वाहन पलटला; चालक जखमी

Manora Vehicle Accident: कारंजा-मानोरा मार्गावर आंब्यांनी भरलेला एक वाहन पलटल्याने चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी आंब्याची लूट केली.

आंबे घेऊन जाणारा वाहन पलटला; चालक जखमी

Manora Vehicle Accident

कारंजा-मानोरा मार्गावर दापुरा गावाजवळील घटना

मानोरा (Manora Vehicle Accident) : आंब्यांनी भरलेला एक वाहन पलटल्याने झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. ही घटना २३ एप्रिल रोजी सकाळी सुमारे १० वाजता कारंजा - मानोरा मार्गावर दापुरा गावाजवळ घडली. या घटनेत वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
   
प्राप्त माहितीनुसार, एम.एच. २७, डीटी १७९९ वाहन आज सकाळी हैदराबादहून आंध्रप्रदेशकडे आंबे घेऊन जात होता. कारंजा - मानोरा मार्गावर दापुरा गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला पलटले. या (Manora Vehicle Accident) अपघातात चालक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वृत्त लिहिल्यावर मानोरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 

ग्रामीणांनी आंब्यांची लूट केली

दापुरा गावाजवळ आंब्यांनी भरलेला वाहन पलटल्यानंतर रस्त्यावर सर्वत्र आंबे विखुरले. हे पाहून आसपासचे ग्रामस्थ घटनास्थळी धावले आणि आंबे उचलण्यासाठी गर्दी केली. अपघाताची गंभीरता दुर्लक्षित करून अनेक नागरिक आंबे गोळा करून घरी नेण्यासाठी धावपळ करतांना दिसून आल्याचे व्हिडिओ व्हायरल होताच मदत सोडून आंब्याची लूट हा प्रकार पहावयास मिळाला. अनेकांनी आंब्यापुढे माणुसकी हरली अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026