आषाढी एकादशी उत्सव

पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी टाळ-मृदुंगाच्या गजर, उत्साहात साजरी

Ashadhi Ekadashi : पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाचा जयघोष

पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी टाळ-मृदुंगाच्या गजर, उत्साहात साजरी

Ashadhi Ekadashi

अमरावती (Ashadhi Ekadashi ) : पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाचा जयघोष करत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण शाळा परिसर "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "विठ्ठल विठ्ठल" या नामघोषाने दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वारकरी तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषेत आकर्षक सादरीकरण केले. अभंग, भजन आणि वारकरी परंपरेवरील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगण्यात आले.

या (Ashadhi Ekadashi) प्रसंगी शाळेचे प्राचार्य सचिन दुर्गे सर यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायातील समता, सेवा, भक्ती आणि संस्कार यांचे महत्त्व पटवून दिले. उपप्राचार्या सोनल निस्ताने मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणारे असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.

संबंधित सामग्री

१५ ऑगस्टला लातूरमध्ये ‘स्वरविलास संगीत दरबार’; अभिजात शास्त्रीय संगीताची सुरेल मेजवानी

१५ ऑगस्टला लातूरमध्ये ‘स्वरविलास संगीत दरबार’; अभिजात शास्त्रीय संगीताची सुरेल मेजवानी

राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लातूरमध्ये ‘स्वरविलास संगीत दरबार’ या अभिजात शास्त्रीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.

Aug 10, 2026
आषाढी वारीत एसटीची विक्रमी कामगिरी; ९ लाखांहून अधिक भाविकांचा प्रवास, महामंडळाच्या तिजोरीत ४१.१८ कोटींची भर

आषाढी वारीत एसटीची विक्रमी कामगिरी; ९ लाखांहून अधिक भाविकांचा प्रवास, महामंडळाच्या तिजोरीत ४१.१८ कोटींची भर

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) केलेल्या विशेष वाहतूक व्यवस्थेला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला.

Aug 02, 2026
आषाढी एकादशीसाठी हिंगोली आगारातून पंढरपूरला धावल्या ५२ बसेस

आषाढी एकादशीसाठी हिंगोली आगारातून पंढरपूरला धावल्या ५२ बसेस

Hingoli Ashadhi Ekadashi Bus: आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना पंढरपूरला सुखकर दर्शनासाठी पाठविण्यासाठी हिंगोली एसटी आगारातून विशेष नियोजन करण्यात आले होते.

Jul 28, 2026
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात’ सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या भक्तिमय दिंडीचे आकर्ष

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरात’ सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या भक्तिमय दिंडीचे आकर्ष

Risod Maharajswa Abhiyan: महाराष्ट्र शासन, तहसील कायम करत 'छत्रपती शिवाजीच्या महाराजस्व अभियान' योजनेसाठी रिसोड येथे आयोजित एक सांस्कृतिक कार्यक्रमात सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी

Jul 27, 2026