(Middle East Crisis) : मध्यपूर्वेत इराणवर अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर भडकलेल्या संघर्षात अखेर तात्पुरता शमवटा दिसून आला आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी कठोर भूमिका घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अचानक मवाळ भूमिका स्वीकारत इराणविरुद्धची लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक संवादाची शक्यता निर्माण झाली आहे.
सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात येणार आहेत. हा निर्णय त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतल्याचेही नमूद केले. या दोघांनी नियोजित हल्ले पुढे ढकलण्याची विनंती केल्यानेच युद्धविरामाचा मार्ग मोकळा झाल्याचे समोर आले आहे.
?????? ?. ????? ????? ?????? ???? ??:?? ?? ??? ??.??.?? pic.twitter.com/Ict1bkhr4b
— Commentary Donald J. Trump Posts From Truth Social (@TrumpDailyPosts) April 8, 2026
दुसरीकडे, इराणनेही पाकिस्तानच्या मध्यस्थीने मांडलेल्या या प्रस्तावाला तात्पुरती संमती दिली आहे. देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने या निर्णयाला मान्यता दिली असली तरी, अमेरिका-इराण चर्चेला युद्ध समाप्तीचे संकेत मानू नयेत, असे तेहरानने स्पष्ट केले आहे. इराणकडून सादर करण्यात आलेल्या १० कलमी प्रस्तावात अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात सर्व प्रकारचे प्राथमिक व दुय्यम निर्बंध उठवणे, युद्धामुळे झालेल्या नुकसानीची पूर्ण भरपाई देणे आणि परदेशात गोठवलेली इराणी मालमत्ता परत देणे या अटींचा समावेश आहे.
Statement on behalf of the Supreme National Security Council of the Islamic Republic of Iran: pic.twitter.com/cEtBNCLnWT
— Seyed Abbas Araghchi (@araghchi) April 7, 2026
इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, तेहरानचा स्पष्ट दृष्टिकोन असा आहे की, केवळ युद्धविराम नव्हे तर संपूर्ण संघर्षाची समाप्तीच त्यांना मान्य असेल. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांदरम्यान पुढील वाटाघाटी होणार असून, १० एप्रिल रोजी इस्लामाबाद येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या चर्चेत इराणच्या अटींवर आणि पुढील तोडग्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
युद्धविरामापर्यंतचा घटनाक्रम
या संपूर्ण घडामोडीत काही महत्त्वाचे टप्पे ठळकपणे समोर आले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानचे पंतप्रधानांनी दोन्ही देशांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आणि त्याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. त्यानंतर पहाटे सुमारे ४ वाजता ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले थांबवण्याची घोषणा करत, होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्याबाबत इराणच्या सहमतीचा उल्लेख केला.
यानंतर काही वेळातच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या प्रयत्नांचे कौतुक करत, हल्ले थांबल्यास इराणकडूनही संरक्षणात्मक कारवाया स्थगित केल्या जातील, असे स्पष्ट केले. तसेच दोन आठवड्यांच्या कालावधीत होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक सुरू ठेवण्याची तयारीही दर्शवण्यात आली.
सकाळी सुमारे ५.२० वाजता पाकिस्तानकडून अधिकृतपणे युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. पंतप्रधानांनी दोन्ही देशांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, हा निर्णय शांततेकडे जाणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले. त्यांनी १० एप्रिल रोजी इस्लामाबाद येथे निर्णायक चर्चेसाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रितही केले आहे.
या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव काहीसा कमी झाला असला, तरी परिस्थिती अद्याप नाजूकच आहे. ‘इस्लामाबाद संवाद’ या बैठकीकडे जगभराचे लक्ष लागले असून, या चर्चेतून कायमस्वरूपी शांततेचा मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.