आशियाई क्रीडा स्पर्धा 2026

भारताच्या लेकींचा तिरंदाजीत ऐतिहासिक सुवर्णवेध!

2026 Asian Games: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय महिला तिरंदाजांनी ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. अंकिता भक्त, कीर्ती आणि कुमकुम महोद यांच्या भारतीय महिला रिकर्व संघाने

भारताच्या लेकींचा तिरंदाजीत ऐतिहासिक सुवर्णवेध!

2026 Asian Games

 

महिला रिकर्व संघाचे दक्षिण कोरियावर 5-3 ने मात

नागोया/ जपान (2026 Asian Games) : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय महिला तिरंदाजांनी ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. अंकिता भक्त, कीर्ती आणि कुमकुम महोद यांच्या भारतीय महिला रिकर्व संघाने अंतिम सामन्यात बलाढ्य दक्षिण कोरियाचा 5-3 असा पराभव करत या प्रकारातील भारताचे पहिले आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले.

दक्षिण कोरियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला सुरुवातीपासूनच कडवी झुंज मिळाली. (2026 Asian Games) पहिल्या सेटमध्ये दोन्ही संघांनी 54-54 गुण मिळवत बरोबरी साधली. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. दुसऱ्या सेटमध्येही सामना अत्यंत अटीतटीचा झाला. भारत आणि दक्षिण कोरियाने 56-56 गुण मिळवल्याने स्कोअर 2-2 असा झाला.

आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारात भारताचे पहिले सुवर्णपदक

तिसऱ्या सेटमध्ये भारतीय तिरंदाजांनी दमदार कामगिरी केली. दबावाच्या परिस्थितीत दक्षिण कोरियाच्या तीन तिरंदाजांचे बाण 8 गुणांच्या वर्तुळात लागले आणि त्यांना 52 गुणांवर समाधान मानावे लागले. भारताने 55 गुणांची नोंद करत हा सेट जिंकला आणि 4-2 अशी आघाडी घेतली.

चौथ्या सेटमध्येही सामना रंगतदार राहिला. (2026 Asian Games) दक्षिण कोरियाने 54 गुण मिळवले. भारताच्या कीर्तीच्या सुरुवातीच्या बाणाला प्रथम 8 गुण देण्यात आले; मात्र रिव्ह्यूनंतर तो बाण 9 गुणांचा असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे भारतानेही 54 गुण मिळवत सेट बरोबरीत सोडवला. या निकालामुळे भारताला आवश्यक गुण मिळाले आणि 5-3 अशा विजयासह सुवर्णपदक निश्चित झाले.

महिला रिकर्व संघाचे पहिलेच सुवर्ण

महिला रिकर्व संघाचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील ऐतिहासिक सुवर्णपदक ठरले. यापूर्वी हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने या प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्या संघात अंकिता भक्त, भजन कौर आणि सिमरनजीत कौर यांचा समावेश होता. त्यावेळी दक्षिण कोरियाने सुवर्णपदक पटकावले होते.

यंदा जपानमध्ये भारतीय महिला तिरंदाजांनी चित्रच बदलून टाकले. या सुवर्णपदकासह आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 11 झाली असून, तिरंदाजीत भारताचे हे चौथे सुवर्णपदक ठरले आहे. भारतीय महिला रिकर्व संघाच्या या (2026 Asian Games) ऐतिहासिक कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पदकतालिकेत आणखी भर पडली आहे.