विभागीय स्पर्धेत १७ वर्षांखालील संघाचा प्रथम क्रमांक; फुटबॉलमध्येही उल्लेखनीय यश
चिखली (State Level Rugby Tournament) : जिल्हा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा व विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये मंगरूळ-इसरूळ येथील नर्मदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. विविध सांघिक क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून रग्बी संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दि. २३ सप्टेंबर रोजी झालेल्या विभागीय रग्बी क्रीडा स्पर्धेत नर्मदा विद्यालयाच्या १७ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या शानदार कामगिरीच्या जोरावर संघाची आगामी राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे. विद्यार्थ्यांनी सांघिक कौशल्य, शिस्त, जिद्द आणि उत्कृष्ट क्रीडाभावनेच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात करत हे यश संपादन केले.
दरम्यान, दि. २६ सप्टेंबर रोजी झालेल्या १४ वर्षांखालील शालेय फुटबॉल स्पर्धेतही (State Level Rugby Tournament) नर्मदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळविला. त्यामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी भर पडली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष देशमुख, विद्यालयाचे प्राचार्य पटेल सर, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या रग्बी संघाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या या (State Level Rugby Tournament) यशामागे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक शेख सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नियमित सराव, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर क्रीडा क्षेत्रात विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही नर्मदा विद्यालयाचा संघ उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.