दिव्यांग महिला टी विश्वचषक विजेत्या गंगा कदम

दिव्यांग महिला क्रिकेट विजेत्या गंगा कदमला शासकीय सेवेत समाविष्ट करा

दिव्यांग महिला टी-20 विश्वचषक विजेत्या, गंगा कदम, कोणत्याही क्रीडा वातावरणाशिवाय विजेतेपद पटकावले. शिवसेना नेते मागतात तिला शासकीय नोकरी व आर्थिक मदत द्यावी.

दिव्यांग महिला क्रिकेट विजेत्या गंगा कदमला शासकीय सेवेत समाविष्ट करा

Disabled Women T-20 World Cup

आ. बांगर व आ. नवघरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री पवार यांची भेट

आखाडा बाळापूर (Disabled Women T-20 World Cup) : कळमनुरी तालुक्या बरोबर जिल्ह्याच नावलौकीक देशपातळीवर व सातसमुद्रापार नेणाऱ्या कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथील गंगा कदम हिने सुरवातीला महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रीकेट संघ कर्णधार म्हणून व नंतर नुकत्याच पार पडलेल्या दिव्यांग महिला टी- 20 विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघात भारतीय संघ उपकर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

गंगा कदम हिच्या क्रीकेट खेळाडू (Disabled Women T-20 World Cup) म्हणून बजावलेल्या दमदार कामगिरी दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन तिला शासकीय सेवेत अधिकारी म्हणून संधी द्यावी तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत आसल्यामुळे गंगा कदम हिला महाराष्ट्र शासनाने विशेष बाब म्हणून मुबलक आर्थीक मदत तात्काळ द्यावी अशी मागणी  शिवसेना जिल्हा प्रमुख आ. संतोष बांगर व वसमत विधानसभेचे आ. राजु नवघरे यांनी 18 मार्च रोजी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांची भेट घेऊन केली आहे.यावेळी क्रिकेट खेळाडू गंगा कदम उपस्थित होती.

 कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथील गंगा कदम हिने सोलापूर येथे शिक्षण घेत कठोर मेहनत व जिद्दीने क्रिकेटपटू म्हणून आपली चमक जिल्हा, विभाग राज्य व नंतर देशपातळीवर दाखवून दिव्यांग महिला टी विश्वचषक विजेत्या संघात उपकर्णधार म्हणून तिने गोलंदाज, फलंदाजी व क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी बजावत विजेतेपद पटकावण्यात मुख्य भुमिका बजावली होती तिच्या कार्याची दखल घेत शासकीय नोकरीत तिला तातडीने समाविष्ट करण्याची मागणी आज आ.संतोष बांगर व आ.राजुभैय्या नवघरे यांनी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांची भेट घेऊन केली आहे.

गंगा कदम ग्रामीण खेळाडू व मुलींसाठी प्रेरणादायी..

कळमनुरी तालुक्यातील फुटाणा या छोट्याशा गावातून घरात कोणत्याही प्रकारचे क्रीडा वातावरण नसताना दिव्यांग (Disabled Women T-20 World Cup) आसताना परिस्थितीवर मात करत आपल्या स्वकर्तुत्वाने दिव्यांग महिला टी भारतीय संघ उपकर्णधार बनून देशाला या स्पर्धेत विश्वविजेता बनवण्यासाठी मोठी भुमिका खेळाडू म्हणून बजावली तिच्या या दमदार कामगिरीमुळे ग्रामीण भागातील खेळाडू विशेष करून महिला मुलीसाठी ती प्रेरणादायी बनली आहे. तिच्या कार्याची दखल घेऊन तातडीने शासकीय सेवेत तिला समाविष्ट करण्यात यावे तसेच आर्थिक मदत देण्यात यावी. -अभय पाटील सावंत मा.सरपंच शेवाळा.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026