जिल्हास्तरीय थांग-ता क्रीडा स्पर्धा

जिल्हास्तरीय शालेय थांग-ता क्रीडा स्पर्धेत नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांची उपस्थिती

Thang-Ta Sports Competition: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडेलाही तितकेच महत्त्व आहे. थांग-ता सारख्या मार्शल आर्ट क्रीडा प्रकारातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास...

जिल्हास्तरीय शालेय थांग-ता क्रीडा स्पर्धेत नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांची उपस्थिती

Thang-Ta Sports Competition

चिखली (Thang-Ta Sports Competition) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडेलाही तितकेच महत्त्व आहे. थांग-ता सारख्या मार्शल आर्ट क्रीडा प्रकारातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, संयम, एकाग्रता आणि संकटांना सामोरे जाण्याची जिद्द निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपले कौशल्य विकसित करून चिखली व बुलढाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी केले.

तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा जिल्हास्तरीय शालेय थांग-ता क्रीडा स्पर्धा २०२६-२७ आयोजित करण्यात आली होती. या (Thang-Ta Sports Competition) स्पर्धेला नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी उपस्थिती लावून सहभागी खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. थांग-ता हा मार्शल आर्ट प्रकार असून, विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक क्षमता, आत्मसंयम आणि निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी या खेळाचे महत्त्व आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.

यावेळी बोलताना पंडितराव देशमुख म्हणाले की, “आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. खेळामुळे शरीर सुदृढ राहण्यासोबतच शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित होते. थांग-ता सारख्या क्रीडा प्रकारातून विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणासह मानसिक कणखरपणाही मिळतो. सहभागी प्रत्येक खेळाडूने खिलाडूवृत्तीने सर्वोत्तम कामगिरी करावी आणि भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर चिखली व बुलढाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे.”

स्पर्धेदरम्यान (Thang-Ta Sports Competition) खेळाडूंमध्ये मोठा उत्साह दिसून आला. विविध शाळांमधून आलेल्या खेळाडूंना शिक्षक, प्रशिक्षक आणि पालकांकडून प्रोत्साहन मिळाले. क्रीडा क्षेत्रात ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळणे आवश्यक असून, अशा स्पर्धांमधून त्यांच्यातील गुणवत्ता पुढे येते, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

या प्रसंगी वायाळ सर, बंगाळे सर, वडुळकर मॅडम, सुरडकर सर, अदनान सय्यद सर, सय्यद सिराज सर, कुटे सर, थांग-ता मार्शल आर्ट जिल्हा सचिव फहीम सौदागर, शहराध्यक्ष सागर पुरोहित, नगरसेवक दत्ता सुसर, दीपक वाधवाणी, राम बनसोडे, प्रशांत बाप्पू देशमुख आणि नईम सौदागर यांची उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बुलढाणा जिल्हा थांग-ता असोसिएशन, क्रीडा मार्गदर्शक, पंच, शिक्षक, प्रशिक्षक, पालक तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. सहभागी सर्व खेळाडूंना पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.