वृषाली बोंद्रे शासन पुरस्कार

सामाजिक कार्याची दखल; वृषाली बोंद्रे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ शासन पुरस्कार

Vrushali Bondre Award: महिला व बालविकास विभागांतर्गत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वृषाली राहुल बोंद्रे यांना शासनाचा प्रतिष्ठेचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’

सामाजिक कार्याची दखल; वृषाली बोंद्रे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ शासन पुरस्कार

Vrushali Bondre Award

चिखली (Vrushali Bondre Award) : महिला व बालविकास विभागांतर्गत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वृषाली राहुल बोंद्रे यांना शासनाचा प्रतिष्ठेचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, दारूबंदी चळवळ तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वृषाली बोंद्रे यांनी महिला सक्षमीकरण, सामाजिक जागृती आणि समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची शासनाने घेतलेली दखल म्हणून हा (Vrushali Bondre Award) पुरस्कार 3 सप्टेंबर 2026 रोजी प्रदान करण्यात आला आहे. महिलांच्या प्रश्नांबाबत जनजागृती, सामाजिक परिवर्तनासाठी विविध उपक्रम तसेच समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.

वृषाली बोंद्रे (Vrushali Bondre Award) यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक कार्याची आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची पावती असून, त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, राजकीय व महिला संघटनांच्या पदाधिकारी आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.