Sugar Price Today

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी साखरेच्या दरात मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरातील भाव

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी साखरेचे दर घसरले. मुंबईत ६८ वरून ५४ रुपये किलो, तर प्रमुख शहरांत १२ ते १६ रुपयांची घट झाली.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी साखरेच्या दरात मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरातील भाव

Sugar Price Today

केंद्राच्या साखर कोटा धोरणाचा परिणाम; कारखान्यांना निर्धारित कोट्यानुसारच विक्री-पुरवठ्याचे निर्देश

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट झाली असून, २२ ऑगस्टच्या तुलनेत १४ सप्टेंबर रोजी साखरेचे दर प्रति किलो १२ ते १६ रुपयांनी कमी झाले आहेत. शहरानुसार दरांमध्ये फरक असला तरी बहुतांश बाजारपेठांमध्ये साखरेच्या किमतीत लक्षणीय घसरण नोंदवण्यात आली आहे.

मुंबईत २२ ऑगस्ट रोजी ६८ रुपये किलो असलेली साखर आता ५४ रुपये किलोवर आली आहे. म्हणजेच मुंबईतील दरात १४ रुपयांची घट झाली. कानपूरमध्ये साखरेचा भाव ६९ रुपयांवरून ५३ रुपये, तर रांचीमध्ये ७० रुपयांवरून ५५ रुपये किलो झाला आहे. कोलकाता आणि गुवाहाटीमध्येही या कालावधीत साखरेच्या दरात प्रति किलो सुमारे १५ रुपयांची घट झाल्याचे दिसून येत आहे.

केंद्राच्या कोटा धोरणामुळे साखर बाजारावर परिणाम

साखरेच्या विक्री आणि पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना पाक्षिक कोट्यानुसारच व्यवहार करण्याचे निर्देश दिले आहेत. उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, निर्धारित कोट्यापेक्षा अधिक किंवा कमी प्रमाणात साखर विक्री अथवा पाठवणी केल्यास संबंधित कारखान्यांवर कारवाई होऊ शकते. यासाठी अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कारवाईची तरतूद आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातील न विकलेली साखर पुढील पंधरवड्याच्या कोट्यात समायोजित करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कारखान्यांना संबंधित पंधरवड्यासाठी मंजूर केलेल्या कोट्याच्या मर्यादेतच साखरेची विक्री आणि पुरवठा करावा लागणार आहे.

५८७ कारखाने आणि दोन रिफायनरींना कोटा

अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने ३० ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी करून सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी ५८७ साखर कारखाने आणि दोन रिफायनरींना एकूण १३ लाख मेट्रिक टन (LMT) साखरेचा कोटा निश्चित केला होता.

या वाटपामध्ये उत्तर प्रदेशला अंदाजे ४.२० लाख टनांचा सर्वाधिक कोटा देण्यात आला. त्यापाठोपाठ महाराष्ट्राला सुमारे ४.१० लाख टन, तर कर्नाटकला १.७७ लाख टन साखरेचा कोटा मिळाला आहे. तामिळनाडू, गुजरात, बिहार आणि पंजाब या राज्यांना अंदाजे २४,००० ते ४४,००० टनांच्या दरम्यान कोटा देण्यात आला आहे.

साखरेच्या साठ्यावर सरकारची नजर

साखर कारखान्यांमधील साठा आणि व्यवहारांवर केंद्र सरकारने देखरेख अधिक कडक केली आहे. सप्टेंबरच्या पंधरवड्याची सुरुवात करताना असलेला साठा, त्या कालावधीतील उत्पादन, विक्री, पाठवणी, वितरण तसेच अखेरचा साठा यासंबंधीचा संपूर्ण तपशील कारखान्यांना ऑनलाइन सादर करावा लागणार आहे. हा तपशील १८ सप्टेंबरपर्यंत देणे बंधनकारक आहे.

याशिवाय साखरेची विक्री झाल्यानंतर सात दिवसांच्या आत तिची पाठवणी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पाठवणीसंदर्भातील जीएसटी बिलांची केंद्रीय आणि राज्य अधिकाऱ्यांकडून संयुक्त विशेष तपासणी केली जाणार आहे.

तुमच्या शहरातील साखरेचे आजचे दर

  • मुंबई: १४ रुपयांची घट; दर ५४ रुपये किलो
  • दिल्ली: १३ रुपयांची घट; दर ५५ रुपये किलो
  • कानपूर: १६ रुपयांची घट; दर ५३ रुपये किलो
  • रायपूर: १३ रुपयांची घट; दर ५५ रुपये किलो
  • कोलकाता: १५ रुपयांची घट; दर ५५ रुपये किलो
  • हैदराबाद: १६ रुपयांची घट; दर ५४ रुपये किलो
  • चेन्नई: १२ रुपयांची घट; दर ५८ रुपये किलो

संबंधित सामग्री

साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता; शंभरीपार जाण्याची भीती

साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता; शंभरीपार जाण्याची भीती

ऊस उत्पादन घटल्याने, कमी स्टॉक आणि इथेनॉल निर्मितीमुळे साखरेचे दर शंभरीपार जाण्याची शक्यता; दिवाळीच्या फराळावर महागाईची झळ बसू शकते.

Oct 01, 2026
औषधांच्या किंमतीत एवढी तफावत का? सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले थेट प्रश्न

औषधांच्या किंमतीत एवढी तफावत का? सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले थेट प्रश्न

कॅन्सरच्या औषधांच्या किंमतीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सवाल केले. २,७०० रुपयांचे औषध २७ हजारांना विकले जात असल्याच्या मुद्द्यावर सुनावणी झाली.

Sep 29, 2026

अनंत चतुर्दशीला मुंबईसह राज्यभर गणरायाला भावपूर्ण निरोप; लालबागच्या राजाचे पहाटे विसर्जन

अनंत चतुर्दशीला मुंबईसह राज्यभर गणरायाला भावपूर्ण निरोप. ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका; पहाटे लालबागच्या राजाचे विसर्जन.

Sep 26, 2026