दीपिका चिखलिया यांची पोस्ट व्हायरल; ‘रामायण’ चित्रपटावर अप्रत्यक्ष टोला

रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिकेत साकारला जाणारा रामायण हा २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरत आहे.

दीपिका चिखलिया यांची पोस्ट व्हायरल; ‘रामायण’ चित्रपटावर अप्रत्यक्ष टोला

Ramayan

मुंबई (Ramayan) : रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिकेत साकारला जाणारा रामायण हा २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरत आहे. तब्बल ४००० कोटींच्या भव्य बजेटमुळे या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली असून, कलाकार आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी रणबीरच्या प्रभू रामाच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे, तर काहींनी चित्रपटावर टीकेची झोड उठवली आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर या चित्रपटाची तुलना थेट १९८० च्या दशकातील गाजलेल्या रामायण मालिकेशी केली जात आहे.

दरम्यान, या मालिकेत सीतेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या दीपिका चिखलिया यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने सध्या चांगलाच चर्चेचा विषय निर्माण केला आहे. त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे अप्रत्यक्षपणे मत व्यक्त करत, “रामायण असं तयार व्हावं की, कोणीही कितीही मोठा खर्च केला तरी त्याची सर येऊ नये,” असा आशय व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याकडे चित्रपटावर टीका म्हणून पाहिलं जात असलं, तरी त्यांनी यापूर्वी चित्रपटाच्या टीझरचं कौतुक केल्याचंही समोर आलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी या प्रोजेक्टबद्दल उत्सुकता व्यक्त केली होती.

१९८० च्या दशकात रामानंद सागर यांनी साकारलेली ‘रामायण’ मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. या मालिकेमुळे अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती.

चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत बोलायचं झाल्यास, ‘रामायण’चा पहिला भाग येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तर दुसरा भाग पुढील वर्षीच्या दिवाळीत प्रदर्शित करण्याची योजना आहे. या भव्य प्रोजेक्टमध्ये रणबीर कपूरसोबत साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार असून, यश रावणाची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्सची जबाबदारी ऑस्करविजेती DNEG या कंपनीकडे असून, निर्मिती नमित मल्होत्रा करत आहेत.

संबंधित सामग्री

प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या घरी आनंदाची बातमी; गणेश चतुर्थीला मुलाचा जन्म

प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या घरी आनंदाची बातमी; गणेश चतुर्थीला मुलाचा जन्म

जुबिन नौटियाल बाबा झाला! १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी मुलाचा जन्म झाला. आई आणि बाळ सुखरूप असल्याची माहिती जुबिनने दिली.

Sep 29, 2026
‘रामायण’चा पहिला अधिकृत गाणं ‘जय जय राम’ रिलीज; रणबीर कपूर-साई पल्लवीच्या नव्या पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा

‘रामायण’चा पहिला अधिकृत गाणं ‘जय जय राम’ रिलीज; रणबीर कपूर-साई पल्लवीच्या नव्या पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा

४००० कोटींच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटातील पहिलं अधिकृत गाणं ‘जय जय राम’ रिलीज झालं आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या नव्या पोस्टरचीही चर्चा आहे.

Sep 14, 2026
ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांच्यावर सहा तासांची स्पाइन सर्जरी;  रुग्णालयातून शेअर केला हेल्थ अपडेट

ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांच्यावर सहा तासांची स्पाइन सर्जरी; रुग्णालयातून शेअर केला हेल्थ अपडेट

ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना यांच्या पाठीच्या कण्यावर सहा तासांची शस्त्रक्रिया झाली. उपचारानंतर त्यांनी रुग्णालयातील आणि घरी परततानाचे फोटो शेअर करत हेल्थ अपडेट दिले.

Sep 12, 2026
ब्रह्मास्त्र 2’ची घोषणा...आलिया-रणबीर पुन्हा एकत्र!

ब्रह्मास्त्र 2’ची घोषणा...आलिया-रणबीर पुन्हा एकत्र!

Alia-Ranbir: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट (Alia-Ranbir) आणि रणबीर कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकण्याची शक्यता आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागात शिवा आणि ईशाच्या भूमिकेत

Aug 20, 2026
पान मसाला जाहिरातींवर सनी देओलचा स्पष्ट नकार; म्हणाला, ‘ज्या गोष्टींवर विश्वास नाही, त्यांचा प्रचार करणार नाही’

पान मसाला जाहिरातींवर सनी देओलचा स्पष्ट नकार; म्हणाला, ‘ज्या गोष्टींवर विश्वास नाही, त्यांचा प्रचार करणार नाही’

पान मसाल्याच्या जाहिरातींवरून बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या चर्चेला आता अभिनेता सनी देओलच्या वक्तव्यामुळे नवा आयाम मिळाला आहे.

Aug 17, 2026