राहुल गांधी

राहुल गांधींनी भाषेचे भान ठेवावे; हसन मुश्रीफ यांचा टोला

Rahul Gandhi: मंत्री हसन मुशरिफ ने राहुल गांधीला भाषिक प्रतिस्पर्धेतील भूमिका परिपूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याने इथेनॉल धोरणासंबंधी तर्कसंगत समन्वय करावे म्हणून सांगितले.

राहुल गांधींनी भाषेचे भान ठेवावे; हसन मुश्रीफ यांचा टोला

Rahul Gandhi

कोल्हापूर (Rahul Gandhi) : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपली भूमिका पार पाडताना भाषेचे भान ठेवणे गरजेचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एकेरी उल्लेख करणे राहुल गांधींना (Rahul Gandhi) शोभत नाही. त्यांनी दोन्ही नेत्यांचा योग्य तो सन्मान राखला पाहिजे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी म्हटले आहे.

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले की, राहुल गांधी (Rahul Gandhi) हे विरोधी पक्षनेते असले तरी कोणाचाही अपमान करण्याचा किंवा शिवीगाळ करण्याचा अधिकार त्यांना नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे वयाने तसेच राजकीय अनुभवाने राहुल गांधींपेक्षा मोठे आहेत. त्यामुळे त्यांनी वयाचा आणि पदाचा सन्मान राखत भाषेचा वापर करावा, असा सल्ला मुश्रीफ यांनी दिला.

इथेनॉल धोरणावरही मुश्रीफ यांचे भाष्य

इथेनॉल धोरणाबाबत बोलताना हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले की, देशात इथेनॉल धोरणाची सुरुवात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झाली. या धोरणाचे स्वागत केले पाहिजे. इथेनॉल धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असून, त्यातून शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासही मदत होत आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी इथेनॉल धोरणावर टीका करण्यापूर्वी त्याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा समजून घ्यावा. शेतकऱ्यांचे नुकसान करून राहुल गांधींना नेमके काय साध्य करायचे आहे, हे मला माहीत नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.

शरद पवार यांनी मला गोविंदबाग येथील ऊस तंत्रज्ञानाची पाहणी करण्यासाठी बोलावले आहे. त्यावेळी पवार साहेबांना इथेनॉल धोरणाबाबत राहुल गांधींना समजावून सांगण्याची विनंती करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

इथेनॉलमुळे वाहनांचे नुकसान होते, असे कोणत्याही वाहन कंपनीने सांगितलेले नाही. केवळ इथेनॉल मिश्रित इंधनामुळे मायलेजमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते, असे सांगितले जात आहे. तसेच धान्य उत्पादक शेतकऱ्यांनाही इथेनॉल धोरणाचा मोठा फायदा होत असल्याचा दावा (Hasan Mushrif) हसन मुश्रीफ यांनी केला.

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
राहुल गांधींकडून ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच; देशभरातील जनतेच्या तक्रारी आणि आंदोलनांची माहिती आता एकाच नकाशावर

राहुल गांधींकडून ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच; देशभरातील जनतेच्या तक्रारी आणि आंदोलनांची माहिती आता एकाच नकाशावर

राहुल गांधी यांनी ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच केले. नागरिकांना तक्रारी व आंदोलनांची माहिती नोंदवता येणार असून, विविध संघर्ष डिजिटल नकाशावर जोडले जाणार आहेत.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026
१००% इथेनॉलवर धावणार टोयोटाची इनोव्हा; ऑक्टोबरमध्ये लॉन्च, गडकरींचा मोठा दावा

१००% इथेनॉलवर धावणार टोयोटाची इनोव्हा; ऑक्टोबरमध्ये लॉन्च, गडकरींचा मोठा दावा

ऑक्टोबरमध्ये १००% इथेनॉलवर चालणारी टोयोटा इनोव्हा लॉन्च होणार असल्याची गडकरींची घोषणा. पेट्रोलची गरज नाही, खर्च ₹२५ प्रतिलिटरइतका असल्याचा दावा.

Sep 27, 2026