विधान परिषद निवडणूक

परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणूकीत तिरंगी लढत...!

Legislative Council Elections: परभणी-हिंगोली विधानसभा निवडणूकीत ७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादाचे उमेदवार विजय जामकर आणि संग्राम जामकर यांनी अर्ज मागे घेतला, शेष उमेदवार महायुती,

परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणूकीत तिरंगी लढत...!

Legislative Council Elections

 

उद्योग मंत्री ना. उदय सामंत, ना. मेघनाताई बोर्डीकर यांची शिष्टाई 

विजय जामकर, संग्राम जामकर, विशाल बुधवंत यांचे अर्ज मागे

परभणी (Legislative Council Elections) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणूक रिंगणात ७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. मात्र गुरुवार ४ जून रोजी राष्ट्रवादीचे मनपा सदस्य विजयसिंह जामकर, जि.प. सदस्य संग्राम जामकर, भाजपचे विशाल बुधवंत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता खरी लढत महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष सुशिल देशमुख यांच्यात होणार असल्याचे दिसून येते. 

परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणूकीत (Legislative Council Elections) महाविकास आघाडीकडून उबाठाचे डॉ. विवेक नावंदर, महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून सईद खान, सुशिल देशमुख, विजय जामकर, विश्वजीत बुधवंत, संग्राम जामकर आणि मेहराज खान शेरगुल खान यांनी उमेदवारी दाखल केली होती. गुरुवार ४ जून रोजी कोण कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महायुतीचे उमेदवार सईद खान हे असताना राष्ट्रवादीच्या विजयसिंह जामकर, संग्राम जामकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र ना. उदय सामंत हे गुरुवारी परभणीत दाखल झाले. त्यांनी महायुतीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर विजयसिंह जामकर व संग्राम जामकर यांनी अर्ज मागे घेतला. राष्ट्रवादीचे आ. राजेश विटेकर यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला. आता राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी महायुतीचा उमेदवार सईद खान यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान या (Legislative Council Elections) निवडणूकीत घोडेबाजार मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेनंतर १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार असून २१ जून रोजी मतमोजणी केली जाईल.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज, २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी.

Sep 22, 2026
विधान परिषदेसाठी उद्या मतदान; मतदारांना शिवसेना उबाठासहीत अपक्ष उमेदवाराची प्रतिक्षा

विधान परिषदेसाठी उद्या मतदान; मतदारांना शिवसेना उबाठासहीत अपक्ष उमेदवाराची प्रतिक्षा

Legislative Council Election: परभणीला गेतेवारी मतदान साठी शिवसेनेच्या उमेदवारी डॉ. विवेक नावंदर व अपक्ष उमेदवारी सुशिल देशमुख यांच्याशी भेट न झाल्यामुळे मतदारांना धक्का लागला.

Jun 17, 2026
महाविकास आघाडीच्या उमेदवार शैलेश अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीच्या उमेदवार शैलेश अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Candidate Shailesh Aggarwal:महाविकास आघाडीचे शैलेश अग्रवाल यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकसाठी उमेदवारी दाखल केली. उपस्थित होते काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, इत्यादींचे नेते व कार्यकर्ते.

Jun 01, 2026
नामनिर्देशन पत्रांच्या छाननीनंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध; राजकीय हालचालींना वेग!

नामनिर्देशन पत्रांच्या छाननीनंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध; राजकीय हालचालींना वेग!

Patur Municipal Council Election: पातूर नगरपरिषद निवडणुकांमध्ये ७ उमेदवारांची वैध यादी जाहीर झाली. अध्यक्ष पदासह १० प्रभागांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार नामांकित केले

May 27, 2026