पानकनेरगाव अनोखा बैलपोळा

पानकनेरगावात शेतकऱ्याचा अनोखा बैलपोळा; दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफी करा

Pankanergaon Unique Bailpola: पानकनेरगाव येथील शेतकरी रामेश्वर हेंद्रे यांनी यंदाचा पारंपरिक बैलपोळा अनोख्या पद्धतीने साजरा करत शेतकरी व ग्रामीण भागातील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले

पानकनेरगावात शेतकऱ्याचा अनोखा बैलपोळा; दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफी करा

Pankanergaon Unique Bailpola

 

सर्जा-राजाच्या सजावटीतून दिला सामाजिक संदेश; गाव वाचवा, देश वाचवा’चा दिला संदेश

सेनगाव, पानकनेरगाव (Pankanergaon Unique Bailpola) : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील शेतकरी रामेश्वर हेंद्रे यांनी यंदाचा पारंपरिक बैलपोळा अनोख्या पद्धतीने साजरा करत शेतकरी व ग्रामीण भागातील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. हेंद्रे यांनी आपल्या सर्जा-राजाला आकर्षक पद्धतीने सजवून त्यावर तसेच बैलपोळ्याच्या मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे फलक लावले होते. ‘दुष्काळ जाहीर करा’, ‘सरसकट कर्जमाफी करा’, ‘शेतकरी वाचवा, शेती वाचवा, देश वाचवा’, ‘गाव वाचवा, ‘सरकारी शाळा वाचवा, शेतकऱ्याच्या मुलाचे भविष्य वाचवा’ तसेच ‘जय जवान, जय किसान’ अशा घोषवाक्यांद्वारे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या.

सध्या पावसाअभावी शेतीसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा या माध्यमातून व्यक्त करण्यात आली. बैलपोळा हा केवळ शेतकरी आणि त्याच्या सर्जा-राजाच्या नात्याचा सण नसून शेती, शेतकरी आणि ग्रामीण जीवनाशी जोडलेली संस्कृती जपण्याचा दिवस आहे, असा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.

रामेश्वर हेंद्रे यांच्या या (Pankanergaon Unique Bailpola) आगळ्यावेगळ्या उपक्रमाने बैलपोळ्याच्या उत्सवाला सामाजिक भानाची जोड मिळाली. सर्जा-राजाच्या सजावटीसोबत फलकांवरील संदेशांनी ग्रामस्थांचे आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.