पाऊस आणि वाऱ्यामुळे मूर्तीचा गेला तोल

गणेशमूर्ती कोसळली, मोठी दुर्घटना टळली!

Ganeshotsav: मिरवणुकीत नेली जात असलेल्या गणेशमूर्तीचा अचानक तोल जाऊन ती भाविकांच्या अंगावर कोसळली. या घटनेमुळे मिरवणुकीत काही काळ एकच गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

गणेशमूर्ती कोसळली, मोठी दुर्घटना टळली!

Ganeshotsav

नालासोपारा (Ganeshotsav) : गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान नालासोपारा येथे धक्कादायक घटना घडली. मिरवणुकीत नेली जात असलेल्या गणेशमूर्तीचा अचानक तोल जाऊन ती भाविकांच्या अंगावर कोसळली. या घटनेमुळे मिरवणुकीत काही काळ एकच गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

नालासोपारा पश्चिमेकडील फन फिएस्टा थिएटर परिसरात शनिवारी सायंकाळी ही घटना घडल्याची माहिती आहे. (Ganeshotsav) गणेशमूर्ती ट्रॉलीच्या माध्यमातून मिरवणुकीत नेली जात होती. त्यावेळी पाऊस आणि वाऱ्यामुळे परिस्थिती बिघडली आणि अचानक मूर्तीचा तोल गेला. (Ganeshotsav) मूर्ती कोसळताच मिरवणुकीत सहभागी असलेल्या नागरिक आणि कार्यकर्त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मूर्तीखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी उपस्थितांनी प्रयत्न केले.

या (Ganeshotsav)  घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आले नाही. गंभीर दुखापतीचीही माहिती नाही. काही वेळात परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मिरवणूक पुन्हा सुरू करण्यात आली.

या घटनेनंतर (Ganeshotsav) गणेशमूर्तींच्या मिरवणुकीदरम्यान सुरक्षिततेची योग्य काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. (Ganeshotsav) विशेषतः मोठ्या आकाराच्या मूर्तींची वाहतूक करताना हवामान, वाऱ्याचा वेग आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळल्याने भाविकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026