मराठा आंदोलक मनोज जरांगे

जरांगे पुन्हा मुंबईत धडकणार?, वक्तव्यामुळे पुन्हा मराठा आंदोलनाची शक्यता

Maratha activist Manoj Jarange: राज्यातील मराठा बांधव मुंबईकडे कूच करू शकतात, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत मराठा आंदोलन होणार का, अशी चर्चा रंगली

जरांगे पुन्हा मुंबईत धडकणार?, वक्तव्यामुळे पुन्हा मराठा आंदोलनाची शक्यता

Manoj Jarange

मुंबई (Maratha activist Manoj Jarange) : राज्यातील मराठा बांधव मुंबईकडे कूच करू शकतात, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत मराठा आंदोलन (Maratha Andolan) होणार का, अशी चर्चा रंगली आहे. मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात येत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. या मुद्द्यावरून सध्या राज्यातील वातावरण तापले असून, त्यातच जरांगे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा मराठा आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, "मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार आहे. सुरतमार्गे, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा, गुजरात, तसेच समुद्रमार्गे गोव्याकडूनही विविध भागांतून मराठे येणार आहेत. एखाद्या वेळी कदाचित मुंबईतच आंदोलन (Maratha Andolan) होण्याची शक्यता आहे. मराठा समाजात याबाबत चर्चा सुरू आहे. एखाद्या वेळी मराठे मुंबईलाच जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. पुन्हा मुंबईतच आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो."

'ती' डिफेंडर कुणाची?

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा पश्चिम महाराष्ट्रात दौरा सुरू असून, यावेळी ते एका डिफेंडर गाडीतून प्रवास करताना दिसले. दरम्यान, ही महागडी गाडी कुणाची आणि ती कुठून आली, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर जरांगे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ही गाडी आपल्याला एका कार्यकर्त्याने वापरण्यासाठी दिल्याचे त्यांनी सांगितले. सांगोला तालुक्यातील सुभाष भोसले यांनी जरांगे यांना ही डिफेंडर गाडी वापरण्यासाठी दिली आहे. या गाडीत पहिल्यांदा मनोज जरांगे यांनी बसावे, ही आपली इच्छा असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.