Maharashtra Cabinet Decisions

फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; नागपूर-अहिल्यानगरमध्ये नवी विद्यापीठे, नाशिकला नवीन न्यायालय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत विविध विभागांशी संबंधित चार मोठे निर्णय घेण्यात आले.

फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; नागपूर-अहिल्यानगरमध्ये नवी विद्यापीठे, नाशिकला नवीन न्यायालय

मंत्रिमंडळ बैठकीत क्रीडा बक्षिस धोरणात सुधारणा; सांगलीतील जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारतीसाठी सरकारी जमीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत विविध विभागांशी संबंधित चार मोठे निर्णय घेण्यात आले. क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल व वन तसेच विधि व न्याय विभागांतर्गत या निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयांचा फायदा नागपूर, अहिल्यानगर, सांगली आणि नाशिक जिल्ह्यांना होणार आहे.

खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी रोख बक्षिस धोरणात सुधारणा

क्रीडा विभागांतर्गत राज्यातील आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसह त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या रोख पुरस्कारांच्या धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर आणि अहिल्यानगरमध्ये नवी विद्यापीठे

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ उभारण्यात येणार आहे.

अहिल्यानगरमधील या खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग या विद्याशाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर तसेच सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

जत नगरपरिषदेसाठी सरकारी जमीन

महसूल व वन विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी मौजे जत येथील २ हजार ५८५ चौ. मीटर शासकीय जमीन देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

पिंपळगाव बसवंत येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय

विधि व न्याय विभागांतर्गत नाशिक जिल्ह्यासाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे वरिष्ठ स्तराचे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. या न्यायालयासाठी आवश्यक पदनिर्मिती आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026