गतीमंद मुली अत्याचार

जन्मदात्या बापाकडूनच गतीमंद मुलीवर वारंवार अत्याचार, मुलगी गर्भवती

Aggressive girls abuse: लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात एका गतीमंद मुलीवर तिच्या बापाने वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी गर्भवती झाल्याचे उघड झाले आहे.

जन्मदात्या बापाकडूनच गतीमंद मुलीवर वारंवार अत्याचार, मुलगी गर्भवती

Aggressive girls abuse

लातूर (Aggressive girls abuse) : लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात संतापजनक घटना घडली असून  जन्मदात्या बापाकडूनच गतीमंद मुलीवर वारंवार अत्याचार, मुलगी गर्भवती राहिली आहे. त्यामुळे आईने दिलेल्या फिर्यादीवरून जन्मदात्या बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून धक्कादायक आणि संतापजनक घटनांची मालिका सुरु आहे. नसरापूर आणि बीडनंतर आता लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातून अत्यंत अमानवी प्रकार उघडकीस आला आहे.

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे  मुलगी गर्भवती असल्याचं समोर आले आहे. या (Aggressive girls abuse) प्रकरणात पीडित मुलीच्या आईने १७ एप्रिल रोजी जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अज्ञात व्यक्तीकडून मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, पीडित मुलगी सुमारे १९ आठवडे २ दिवसांची गर्भवती असल्याचे समोर आले होते, त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले. तक्रारीनंतर जळकोट पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.

तपासादरम्यान संशयाच्या आधारे मुलीच्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत संबंधित आरोपी वडिलांनीच हे कृत्य केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या (Aggressive girls abuse) प्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा  नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026