लातूर (Latur Lahu Shakti) : आदिवासींचे नेते तथा थोर विचारवंत साहित्यिक रामराजे आत्राम यांची लहू शक्तीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. लहू शक्तीचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानोबा जरीपटके यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१३) लातूरच्या पत्रकार भवनात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
राज्याच्या कार्यकारिणीत कार्याध्यक्ष प्रा.राम तुळशीराम काकडे, कोषाध्यक्ष पत्रकार लहू शिंदे, उपाध्यक्ष प्रा.बालाजी सोनकांबळे, सल्लागार एडवोकेट अंगद विश्वनाथ गायकवाड, संघटक डोंगरे नागनाथ नामदेवराव सरचिटणीस जी ए गायकवाड, मराठवाडा अध्यक्ष जालिंदर कांबळे, मराठवाडा उपप्रमुख तुकाराम विठ्ठलराव पाठक, लातूर जिल्हा अध्यक्ष उत्तम विश्वनाथ कदम, लातूर तालुका अध्यक्ष योगीराज रघुनाथ कांबळे, शिरूर तालुका अध्यक्ष बाबुराव माधवराव भुरे यांची निवड करण्यात आली.
या (Latur Lahu Shakti) निवडीनंतर बोलताना रामराजे आत्राम म्हणाले की, मातंग समाजावर सतत अन्याय होत आलेला आहे, तो अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन उभे करून मातंग समाजाला न्याय देण्यात येईल. मातंग समाजाच्या तरुणांना आणि सुशिक्षित बेकारांना योग्य तो न्याय मिळवून देण्यात येईल. महिलांना न्याय मिळवून देण्यात येईल आणि उस्ताद लहुजी साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा लातूर शहरांमध्ये उभा करण्यासाठी संघर्ष करण्यात येईल. या बैठकीस मातंग समाजातील मान्यवर नेते मंडळी आणि विचारवंत उपस्थित होते.
लातूर लहू शक्ती
लहू शक्तीच्या प्रदेशाध्यक्षपदी रामराजे आत्राम यांची निवड
Latur Lahu Shakti: 'आन्याय दूर करण्यासाठी' सांगितले राहिले. लहू शक्तीच्या बॅटलर रामराजे आत्रम यांना प्रेसिडेंट निवड झाली. त्यांनी मातंग समाजासाठी आंदोलने सुरू केले आहे.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Latur Lahu Shakti