नवी दिल्ली (India's Flying Car) : आकाशात उडणारी कार हे स्वप्न चित्रपटांपुरते मर्यादित राहू नये, यासाठी अल्मोडा जिल्ह्यातील रवि टम्टा यांनी प्रत्यक्ष प्रयोग सुरू केला आहे. विज्ञान किंवा अभियांत्रिकीची पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांतून ‘हपिडा स्काईनेक्स’ नावाची वन-सीटर इलेक्ट्रिक हेलीकार विकसित केली आहे. या प्रोटोटाइपची पहिली चाचणीही यशस्वी झाली असून कार सुमारे एक मिनिट हवेत राहण्यात यशस्वी ठरली.
रवि टम्टा यांचे वडील हरिश राम हे काफलीखान येथे मोटर मेकॅनिक म्हणून काम करतात. रवि यांनी नैनीतालमधून बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले आहे. मात्र, (India's Flying Car) लहानपणापासून यंत्रे आणि तंत्रज्ञानाबद्दल असलेल्या कुतूहलातून त्यांनी विविध प्रयोग सुरू केले. 2015 मध्ये त्यांच्या मनात उडणारी कार तयार करण्याची कल्पना आली आणि त्यानंतर जवळपास दशकभराच्या प्रयत्नांतून या प्रोटोटाइपने आकार घेतला.
200 किमी प्रतितास वेगाने उडण्याचा दावा
रवि यांनी विकसित केलेली ‘हपिडा स्काईनेक्स’ ही वन-सीटर इलेक्ट्रिक हेलीकार असून, तिचा संभाव्य वेग ताशी 200 किलोमीटरपर्यंत असल्याचे सांगण्यात येते. ड्रोन तंत्रज्ञानाच्या पुढील स्वरूपातून ही वैयक्तिक हवाई वाहतूक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या (India's Flying Car) प्रोटोटाइपची प्राथमिक चाचणी घेताना ती सुमारे एक मिनिट हवेत उडली. या यशानंतर रवि यांनी तंत्रज्ञानाचा पुढील विकास आणि सुरक्षितता चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
घरातून सुरू झाला प्रयोग
ही हेलीकार विकसित करण्यासाठी रवि यांनी ‘हपिडा स्काय प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या माध्यमातून काम केले. आवश्यक सुटे भाग चीनमधून, तर इंजिन मद्रास येथून आणण्यात आले. त्यानंतर घरच्या पातळीवर या भागांची जुळवाजुळव करून त्यांनी प्रोटोटाइप तयार केला. या (India's Flying Car) तंत्रज्ञानासाठी पेटंट प्रक्रियाही करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. भविष्यात या वाहनाचा व्यावसायिक आणि सुरक्षित वापर करता यावा, यासाठी रवि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाशी संपर्क साधण्याच्या तयारीत आहेत.
जंगलातील ‘पिरुल’पासून रोजगाराची संधी
रवि टम्टा यांचा प्रयोग केवळ उडणाऱ्या कारपुरता मर्यादित नाही. उत्तराखंडच्या जंगलांमध्ये आगीचे एक कारण ठरणाऱ्या चीडच्या सुकलेल्या पानांना म्हणजेच ‘पिरुल’ला उपयोगी संसाधनात रूपांतरित करण्यासाठी त्यांनी ‘पाइनपीट मशीन’ विकसित केली आहे. या (India's Flying Car) यंत्राच्या माध्यमातून पिरुलपासून पाइनपीट आणि बायो-पेलेट्स तयार करता येतात. यांचा वापर रोपवाटिका आणि ऊर्जा निर्मितीसाठी केला जाऊ शकतो. या मॉडेलला जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीकडूनही सहकार्य मिळाले असून, उत्तराखंडातील दहा जिल्ह्यांमध्ये त्याचा विस्तार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येते.