विजेती लव्हलिना बोरगोहेन

नकाशासाठी लढली लव्हलिना; मोदींकडून कौतुक

Winner Lovlina Borgohain: ग्लासगोमध्ये भारताच्या नकाशातील गंभीर चूक निदर्शनास आणून देणारी भारताची स्टार बॉक्सर आणि रौप्यपदक विजेती लव्हलिना बोरगोहेन हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक

नकाशासाठी लढली लव्हलिना; मोदींकडून कौतुक

Lovlina Borgohain

ग्लासगोतील चुकीच्या नकाशावर घेतला आक्षेप; विजयाच्या जल्लोषातही देशभान जपले

मुंबई (Winner Lovlina Borgohain) : ग्लासगोमध्ये भारताच्या नकाशातील गंभीर चूक निदर्शनास आणून देणारी भारताची स्टार बॉक्सर आणि रौप्यपदक विजेती लव्हलिना बोरगोहेन (Lovlina Borgohain) हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कौतुक केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंशी मोदी यांनी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी लव्हलिनाच्या प्रसंगावधानाचे विशेष कौतुक केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने बॉक्सिंगमध्ये १० पदके जिंकली होती.

या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय बॉक्सर ग्लासगोतील एका उपाहारगृहात गेले होते. तेथे मेन्यू पत्रिकेवर भारताचा चुकीचा नकाशा असल्याचे लव्हलिनाच्या निदर्शनास आले. या नकाशात ईशान्य भारताचा भागच दाखवण्यात आला नव्हता. (Lovlina Borgohain) लव्हलिनाने उपाहारगृह व्यवस्थापनाकडे हा मुद्दा नम्रपणे मांडला. ईशान्य भारताची नागरिक म्हणून हा नकाशा पाहून आपल्याला दुःख झाल्याचे तिने सांगितले. व्यवस्थापनाने तत्काळ चूक दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले.

पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) संवादादरम्यान लव्हलिनाला, “तू उपाहारगृहाच्या मालकाशी भांडलीस का?” असा मिश्कील प्रश्न केला. त्यावर लव्हलिनाने हा आनंदाचा प्रसंग असल्याचे सांगत चुकीचा नकाशा दिसल्यानंतर आपण नम्रपणे आक्षेप घेतल्याचे स्पष्ट केले. मोदी म्हणाले, विजयाचा आनंद साजरा करत असतानाही देशाच्या नकाशाबाबत सजग राहणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. हा प्रसंग लोक दीर्घकाळ लक्षात ठेवतील, असेही त्यांनी नमूद केले.

संबंधित सामग्री

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
‘मला नरेंद्र नावाचीच चीड आली’; बॉक्सर नरेंद्र बेरवाल यांनी PM मोदींना सांगितला पाकिस्तानी बॉक्सरचा भन्नाट किस्सा

‘मला नरेंद्र नावाचीच चीड आली’; बॉक्सर नरेंद्र बेरवाल यांनी PM मोदींना सांगितला पाकिस्तानी बॉक्सरचा भन्नाट किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजधानीतील त्यांच्या निवासस्थानी २०२६ कॉमनवेल्थ गेम्सच्या भारतीय पथकाची भेट घेतली.

Aug 10, 2026
20 सैनिक, 16 पदके! राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय लष्कराची ऐतिहासिक कामगिरी

20 सैनिक, 16 पदके! राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय लष्कराची ऐतिहासिक कामगिरी

Commonwealth Games 2026: देशाने ग्लासगो येथे पाठवलेल्या 122 खेळाडूंपैकी केवळ 20 खेळाडू लष्कराचे होते. याचा अर्थ संपूर्ण संघात लष्कराचे अंदाजे 16 टक्के खेळाडू असून, पदके जिंकण्यात सर्वाधिक योगदान

Aug 03, 2026
'चोर, चोर' ते अंडी आणि दगड फेक ; अभिषेक बॅनर्जींवरील हल्ला कसा घडला?

'चोर, चोर' ते अंडी आणि दगड फेक ; अभिषेक बॅनर्जींवरील हल्ला कसा घडला?

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसविरोधातील नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आल्याचा दावा केला जात आहे.

May 31, 2026
५५ वर्षीय नराधमाचा १० वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपी फरार

५५ वर्षीय नराधमाचा १० वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपी फरार

Girl Abuse Case: चान्नी ठाणे हद्दीत ५५ वर्षीय एक व्यक्तीने १० वर्षीय मुलीवर अत्याचार केला. गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

May 05, 2026