पुण्यात भुजबळांच्या हेलिकॉप्टर लँडिंगमध्ये गोंधळ; पार्किंगमध्ये उतरलं हेलिकॉप्टर ; सुदैवाने अनर्थ टळला

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टर लँडिंगवेळी अनपेक्षित प्रकार घडला.

पुण्यात भुजबळांच्या हेलिकॉप्टर लँडिंगमध्ये गोंधळ; पार्किंगमध्ये उतरलं  हेलिकॉप्टर ;  सुदैवाने अनर्थ टळला

Helicopter Landing Error

मोकळी जागा पाहून घेतला निर्णय; पायलटवर कारवाईची शक्यता

पुणे (Helicopter Landing Error) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टर लँडिंगवेळी अनपेक्षित प्रकार घडला. नियोजित हेलिपॅडऐवजी पायलटने चुकून कार पार्किंगच्या मोकळ्या जागेत हेलिकॉप्टर उतरवल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.

ही घटना पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे घडली. महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी भुजबळ नाशिकहून येथे येत होते. कार्यक्रमासाठी गावात हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, परिसरात असलेल्या पार्किंगमधील मोकळ्या जागेला हेलिपॅड समजून पायलटने तिथेच हेलिकॉप्टर उतरवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

त्या वेळी पार्किंगमध्ये वाहनांची गर्दी नव्हती, त्यामुळे ही चूक गंभीर अपघातात रूपांतरित होण्यापासून थोडक्यात टळली. भुजबळ हेलिकॉप्टरमधून खाली उतरल्यावर, ते यान पुन्हा अधिकृत हेलिपॅडकडे हलवण्यात आले.

दरम्यान, या घटनेची दखल भुजबळ यांच्या कार्यालयाने घेतली असून, पायलटच्या निष्काळजीपणाबाबत पुढील कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे. कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक मान्यवर, त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती अपेक्षित होती.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर

दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोने ₹१,४९,७००, तर २२ आणि १८ कॅरेटचे दरही कमी झाले.

Oct 07, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026