बँक कर्मचारी संघटना

देशभरात रविवारी सुरू राहणार सरकारी बँका! संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय

Bank Employees' Union: बँक कर्मचारी संघटनांनी 28 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सलग अनेक दिवस बँकिंग सेवांपासून वंचित राहावे

देशभरात रविवारी सुरू राहणार सरकारी बँका! संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय

Bank Employees' Union

नवी दिल्ली/ मुंबई (Bank Employees' Union) : बँक कर्मचारी संघटनांनी 28 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सलग अनेक दिवस बँकिंग सेवांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 27 सप्टेंबर, रविवार रोजी सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सुरू ठेवण्यात येणार आहेत.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने 27 सप्टेंबरचा रविवार हा सार्वजनिक क्षेत्रातील आणि (Bank Employees' Union) प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी नियमित कामकाजाचा दिवस म्हणून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

सलोखा बैठकीत तोडगा नाही

बँक कर्मचारी संघटना (Bank Employees' Union) आणि संबंधित पक्षांमध्ये मंगळवारी डेप्युटी चीफ लेबर कमिश्नर यांच्या उपस्थितीत सलोखा बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यानंतर UFBU ने प्रस्तावित तीन दिवसांचा संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. संपामुळे बँकिंग व्यवहारांवर सलग अनेक दिवस परिणाम होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टैग्स: Bank Employees Union