अयोध्या राम मंदिर प्रसाद

अयोध्या प्रसादाच्या नावाने मिठाई विक्री; ॲमेझॉनवर दंडात्मक कारवाई

Ayodhya Ram Mandir Prasad: अयोध्येतील राम मंदिराचा प्रसाद असल्याचा दावा करून मिठाई व खाद्यपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी ग्राहक न्यायाधिकरणाने ॲमेझॉनला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला

अयोध्या प्रसादाच्या नावाने मिठाई विक्री; ॲमेझॉनवर दंडात्मक कारवाई

Ayodhya Ram Mandir Prasad

नवी दिल्ली (Ayodhya Ram Mandir Prasad) : अयोध्येतील राम मंदिराचा प्रसाद असल्याचा दावा करून मिठाई व खाद्यपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी ग्राहक न्यायाधिकरणाने ॲमेझॉनला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘संधू ट्रेडिंग कंपनी’च्या ‘बीगरी ब्रदर्स’ या ब्रँडमार्फत हे पदार्थ विकले जात होते.

तुपाचे लाडू, गोव्याचे लाडू, पूंडीचे लाडू आणि गायीच्या दुधाचे पेढे यांची विक्री करण्यात आली. उत्पादनांच्या वर्णनात ‘अयोध्या राम मंदिराचा प्रसाद’ आणि ‘श्रीरामांचा आशीर्वाद’ असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे ग्राहकांनी हे पदार्थ मंदिरातील प्रसाद (Ayodhya Ram Mandir Prasad) असल्याचे समजून खरेदी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने जानेवारी २०२४ मध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीत न्यायाधिकरणाने ॲमेझॉन केवळ मध्यस्थ असल्याचे सांगून जबाबदारी झटकू शकत नाही, असे स्पष्ट केले. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही व्यासपीठावर असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा अंतरिम दिलासा; ५ कोटी रुपये जमा करण्याची अट

राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा अंतरिम दिलासा; ५ कोटी रुपये जमा करण्याची अट

राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा अंतरिम दिलासा; आत्मसमर्पणापासून संरक्षणासाठी बुधवारपर्यंत ५ कोटी रुपये जमा करण्याची अट.

Sep 09, 2026
हिंगोली जिल्ह्यात मागील महिन्यात अवैध धंद्याचे तब्बल ३३० गुन्हे दाखल; अवैध व्यवसाय उच्चाटनाला कोलदांडा

हिंगोली जिल्ह्यात मागील महिन्यात अवैध धंद्याचे तब्बल ३३० गुन्हे दाखल; अवैध व्यवसाय उच्चाटनाला कोलदांडा

Hingoli illegal business: नांदेड पोलिसेसाठी उपमहानिरिक्षक शाहजी उमापाने जुलैत ३३० गुन्हे अवैध धंद्यावर पकडले. हिंगोलीतील सर्वाधिक कारवाई अवैध दारू व मटका

Aug 02, 2026
अयोध्येतील श्रीराम मंदिर चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ चिखलीत शिवसेनेचे तीव्र आंदोलन

अयोध्येतील श्रीराम मंदिर चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ चिखलीत शिवसेनेचे तीव्र आंदोलन

Ram Mandir Daan Chori: अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना व युवासेनेच्या वतीने चिखली शहरात तीव्र आंदोलन, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली

Jul 06, 2026
तू काळी आहेस, पांढऱ्या पायाची आहेस...'; विवाहितेचा छळानंतर खून, पती-सासऱ्याला अटक

तू काळी आहेस, पांढऱ्या पायाची आहेस...'; विवाहितेचा छळानंतर खून, पती-सासऱ्याला अटक

बीड जिल्ह्यातील कुटेवाडी येथे 23 वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे.

Jun 11, 2026