आशिया क्षयरोग निर्मूलन

आग्नेय आशियात 2030 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य आव्हानात्मक

Tuberculosis Eradication in Asia: आग्नेय आशियाई प्रदेशात क्षयरोगाच्या (TB) नियंत्रणासाठी उपचार आणि निदानाच्या क्षेत्रात प्रगती झाली असली, तरी 2030 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य

आग्नेय आशियात 2030 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य आव्हानात्मक

Tuberculosis Eradication

WHO कडून अधिक प्रयत्नांचे आवाहन

नवी दिल्ली (Tuberculosis Eradication in Asia) : आग्नेय आशियाई प्रदेशात क्षयरोगाच्या (TB) नियंत्रणासाठी उपचार आणि निदानाच्या क्षेत्रात प्रगती झाली असली, तरी 2030 पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य गाठण्यासाठी सध्याची प्रगती पुरेशी नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्ट केले आहे. क्षयरोगाचे निदान, उपचार, प्रतिबंध आणि रुग्णांना आर्थिक संरक्षण देण्याच्या क्षेत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रदेशातील देशांनी अधिक व्यापक आणि प्रभावी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली आहे.

2024 मध्ये 36.8 लाख रुग्णांची नोंद

WHO च्या माहितीनुसार, 2024 मध्ये आग्नेय आशियाई प्रदेशात अंदाजे 36.8 लाख (Tuberculosis Eradication) क्षयरोग रुग्ण आढळले, तर सुमारे 4.33 लाख रुग्णांचा मृत्यू झाला. जगभरातील नव्याने आढळणाऱ्या क्षयरोग रुग्णांपैकी जवळपास 34 टक्के रुग्ण या प्रदेशातील आहेत. मात्र, 2015 च्या तुलनेत नव्या क्षयरोग रुग्णांच्या संख्येत सुमारे 16 टक्के घट, तर क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २३ टक्के घट झाली आहे. उपचारांची व्याप्तीही 85 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. तरीही 2030 पर्यंत नव्या रुग्णसंख्येत 80 टक्के आणि मृत्यूंमध्ये 90 टक्के घट करण्याचे उद्दिष्ट गाठणे अद्याप मोठे आव्हान असल्याचे WHO ने म्हटले आहे.

औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचेही गंभीर आव्हान

क्षयरोगाच्या नियंत्रणासमोर औषध-प्रतिरोधक (Tuberculosis Eradication) क्षयरोगाचे (Drug-resistant TB) आव्हानही कायम आहे. 2024 मध्ये प्रदेशात अंदाजे 1.5 लाख बहुऔषध-प्रतिरोधक किंवा रिफॅम्पिसिन-प्रतिरोधक क्षयरोग रुग्णांची नोंद झाली. कुपोषण, मधुमेह, तंबाखूचे सेवन आणि सामाजिक-आर्थिक अडचणी यांसारख्या घटकांमुळे क्षयरोगाचा प्रसार रोखण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

उपचारांचा आर्थिक बोजा मोठा

क्षयरोगामुळे (Tuberculosis Eradication) केवळ आरोग्यावरच नव्हे, तर रुग्णांच्या कुटुंबांच्या आर्थिक स्थितीवरही मोठा परिणाम होत आहे. उपलब्ध माहितीनुसार, क्षयरोगग्रस्त सुमारे 44 टक्के कुटुंबांना उपचारांमुळे विनाशकारी आर्थिक खर्चाचा सामना करावा लागतो. याशिवाय, क्षयरोग नियंत्रणासाठी उपलब्ध निधीही गरजेच्या तुलनेत अपुरा आहे. 2024 मध्ये या प्रदेशातील क्षयरोग नियंत्रणासाठी सुमारे 90 कोटी डॉलरचा निधी उपलब्ध होता, तर प्रत्यक्ष गरज सुमारे ३०० कोटी डॉलरची होती.

देशांतर्गत निधी वाढवण्याचे आवाहन

क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य (Tuberculosis Eradication) गाठण्यासाठी देशांनी देशांतर्गत निधी वाढवणे, आधुनिक निदान तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक वापर करणे आणि भविष्यात उपलब्ध होणाऱ्या नव्या क्षयरोग लसींच्या वापरासाठी आवश्यक तयारी करणे, यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्याची प्रगती सकारात्मक असली, तरी 2030 चे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्यासाठी निदानापासून उपचार आणि आर्थिक संरक्षणापर्यंतच्या संपूर्ण आरोग्यव्यवस्थेत वेगाने सुधारणा करणे आवश्यक असल्याचे WHO ने स्पष्ट केले आहे.