ताकतोडा डेंग्यूसदृश आजार

स्वच्छतेचा अभाव व दूषित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थ चिंतेत

Taktoda Dengue-like illness:

स्वच्छतेचा अभाव व दूषित पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थ चिंतेत

Taktoda Dengue-like illness

 

ताकतोडा येथे डेंग्यूसदृश आजाराचा धोका

सेनगाव (Taktoda Dengue-like illness) : तालुक्यातील ताकतोडा येथे अस्वच्छता, फवारणीचा अभाव आणि पिण्याच्या पाण्याच्या टाकीत साचलेला गाळ यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, गावात डेंग्यूसदृश रुग्ण आढळत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे ताकतोडा येथे सध्या काही नागरिकांमध्ये डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळून येत असून रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात नियमितपणे आवश्यक स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेली नाही. तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक फवारणी किंवा धूरफवारणी करण्यात आलेली नाही. गावातील साचलेले पाणी, नाल्या व परिसराची योग्य साफसफाई न झाल्याने डासांची उत्पत्ती होण्यास पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.  याशिवाय, गावाला पुरवठा करण्यात येणार्‍या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याचे निदर्शनास आले आहे.

शा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टाकीची तातडीने स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. 
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना तात्काळ आदेश देऊन गावात स्वच्छता मोहीम राबवावी, फवारणी करावी व पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समस्त ताकतोडा ग्रामस्थांनी केली आहे.

या निवेदनावर अमोल सावके, पुरुषोत्तम  मानमोठे, नागदेव  मानमोठे, विठ्ठल सावके, गजानन सावके, माधव  मानमोठे, ज्ञानबा उगले, सोपान कव्हर, विश्वनाथ ठाकरे, नामदेव  सावके, गजानन उगले, ओम मुदंडा, गोपाळ सावके, चेतन सावके, प्रकाश सावके, विकास सावके, विनोद  सावके, रमेश  सावके, मनोहर  सावके आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.