एसी कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती
इस्लामाबाद (Government Hospital Newborns Death) : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. शहरातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) येथील माता व बाल आरोग्य विभागातील नवजात शिशूंच्या नर्सरीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत 15 नवजात बाळांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, (Government Hospital Newborns Death) रुग्णालय प्रशासनाकडून मृतांचा अंतिम आकडा अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, नर्सरीमध्ये सुमारे 16 नवजात बाळे असताना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आग लागली. एअर कंडिशनरच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने संपूर्ण वॉर्डला वेढा घातला आणि धुराचे मोठे लोट पसरले.
हा माता व बाल आरोग्य विभाग रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Government Hospital Newborns Death) आग लागल्याची माहिती मिळताच बचाव आणि मदत पथके घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकांनी शर्थीचे प्रयत्न करून बाळांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आणि धुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. प्राथमिक माहितीनुसार, केवळ एका बाळाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
A #fire has broken out in the children’s ward at the Pakistan Institute of Medical Sciences (PIMS) Hospital in #Islamabad, killing at least 15 newborns. #GeoNews reported that the nursery at PIMS housed 16 newborns at the time of the incident only 1 rescued. pic.twitter.com/nmrIyXDwB6
— Surbhi Garwal (@surbhigarwal) August 26, 2026
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर 14 नवजात बाळांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळले. दरम्यान, PIMSच्या प्रवक्त्या डॉ. अनीझा जलील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या आदल्या रात्री काही बाळांना डिस्चार्ज देण्यात आले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा नेमका आकडा सध्या निश्चित सांगता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इस्लामाबाद-मुरे द्रुतगती मार्गावरही भीषण अपघात
याच दिवशी पाकिस्तानमध्ये आणखी एक मोठी दुर्घटना घडली. इस्लामाबाद-मुरे द्रुतगती मार्गावर खजूतजवळ एका व्हॅनचा अपघात होऊन त्यानंतर वाहनाला आग लागली. ‘डॉन’च्या वृत्तानुसार, वळणावर व्हॅन रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर आदळली आणि त्यानंतर वाहनाने पेट घेतला. या व्हॅनमध्ये 23 जण प्रवास करत होते. अपघातानंतर लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Government Hospital Newborns Death) दोन्ही दुर्घटनांमुळे पाकिस्तानमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.