श्री सत्यसाई ब्लड सेंटर

रक्तदान म्हणजे जीवनदान; श्री सत्यसाई ब्लड सेंटर ठरत आहे हजारो रुग्णांसाठी आधारवड

Sri Sathya Sai Blood Centre: महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे रक्तपेढी श्री सत्यसाई ब्लड सेंटर शनिवारी जागतिक रक्तदाता दिनासाठी रक्तदानाचा महत्त्व व थॅलेसेमिया, हिमोफिलियाचा उपचार पुढे करत आहे.

रक्तदान म्हणजे जीवनदान; श्री सत्यसाई ब्लड सेंटर ठरत आहे हजारो रुग्णांसाठी आधारवड

Sri Sathya Sai Blood Centre

चिखली (Sri Sathya Sai Blood Centre) : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त शनिवारी श्री सत्यसाई ब्लड सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ. महेंद्रसिंग चौहान यांनी प्रतिनिधींशी संवाद साधताना रक्तदानाचे महत्त्व, रक्तपेढीचे कार्य आणि थॅलेसेमिया रुग्णांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी समाजातील प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करण्याची गरज अधोरेखित केली.

रक्त हे कृत्रिमरीत्या तयार करता येत नसल्याने रक्तदान हेच रुग्णांसाठी जीवनदान ठरते. अपघातग्रस्त, प्रसूतीतील माता, कर्करोगग्रस्त तसेच थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल अॅनेमिया यांसारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी रक्त अत्यावश्यक असते. वेळेवर उपलब्ध झालेले रक्त अनेकदा रुग्णाचे प्राण वाचवते. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत (Sri Sathya Sai Blood Centre) श्री सत्यसाई ब्लड सेंटर हे मराठवाड्यासह विदर्भातील रुग्णांसाठी मोठा आधार बनले आहे. संभाजीनगरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यासह बुलढाणा, वाशीम आणि इतर जिल्ह्यांतील रुग्णांना या रक्तपेढीच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार रक्त व रक्तघटकांचा पुरवठा केला जातो.

मोठ्या शहरात ओळखी नसताना रक्ताची व्यवस्था करणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरते; मात्र अशा वेळी हे (Sri Sathya Sai Blood Centre) केंद्र मदतीचा हात पुढे करत असल्याचे डॉ. चौहान यांनी सांगितले. यावेळी डॉ. चौहान यांनी सांगितले की, देशातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले असे हे रक्तकेंद्र आहे, जे थॅलेसेमिया बाधित मुलांच्या पालकांनी उभारले आणि चालविले आहे. सध्या या केंद्रामार्फत २७३ थॅलेसेमिया रुग्ण मुलांना दर २१ दिवसांनी मोफत रक्त पुरवठा केला जात असून हे कार्य सामाजिक दायित्वातून सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. हैदराबादनंतर अशा स्वरूपाचे हे दुसरे केंद्र असल्याची माहितीही त्यांनी दिली.

औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटीच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या रक्तपेढीत थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल अॅनेमिया तसेच वारंवार रक्त संक्रमणाची गरज असलेल्या रुग्णांना मोफत रक्त व रक्तघटक उपलब्ध करून दिले जातात. रक्तगट तपासणीसाठी अत्याधुनिक Gel Card, थॅलेसेमिया निदानासाठी HB Electrophoresis, Atypical Antibody Screening, CAT Cross Matching, Plateletpheresis आणि Leucodepletion यांसारख्या आधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. अनुभवी ट्रान्सफ्युजन मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर व तंत्रज्ञ २४ तास सेवेसाठी सज्ज असतात.

डॉ. चौहान यांनी रक्तदात्यांचे विशेष आभार मानत सांगितले की, समाजातील स्वयंसेवी रक्तदात्यांमुळेच हजारो रुग्णांना वेळेवर रक्त मिळत आहे. एका रक्तदात्याच्या रक्तातून अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे अधिकाधिक युवक-युवतींनी आणि नागरिकांनी नियमित रक्तदान करून या जीवनदायी चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
"रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देण्याचे पवित्र कार्य आहे. (Sri Sathya Sai Blood Centre) गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळाले तर त्याचे प्राण वाचू शकतात आणि त्याच्या कुटुंबाला नवी आशा मिळू शकते. रक्तदाता हा समाजातील खरा जीवनदाता आहे," असे मत डॉ. महेंद्रसिंग चौहान यांनी व्यक्त केले.

संपर्क :
श्री सत्यसाई ब्लड सेंटर
N-5, CIDCO, छत्रपती संभाजीनगर
मो. 9168104104 / 9309289072 / 9365109457
छायाचित्र ओळ : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदानाचे महत्त्व व श्री सत्यसाई ब्लड सेंटरच्या कार्याविषयी माहिती देताना वैद्यकीय संचालक डॉ. महेंद्रसिंग चौहान.

संबंधित सामग्री

देवाभाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २५ रक्तदात्यांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी 

देवाभाऊंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २५ रक्तदात्यांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी 

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्र प्रदेशच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त(sewa saptah)सेवा सप्ताह अभियान राबविण्यात येत असून या अनुषंगाने रक्तदान

Jul 23, 2026
रोटरी क्लब ऑफ नांदेडतर्फे वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

रोटरी क्लब ऑफ नांदेडतर्फे वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

Rotary Club of Nanded: रोटरी क्लब ऑफ नांदेड आणि रोटरी क्लब नंदीग्राम नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि १ जुलै  रोजी कृषी दिन, डॉक्टर दिन, सीए दिन आणि रोटरी नूतन वर्षारंभाचे औचित्य साधून वृक्षारोपण

Jul 03, 2026
विनोदभाऊ खटके यांच्या वाढदिवसानिमित्त 86 जणांचे रक्तदान; 132 जणांची नेत्ररोग तपासणी

विनोदभाऊ खटके यांच्या वाढदिवसानिमित्त 86 जणांचे रक्तदान; 132 जणांची नेत्ररोग तपासणी

Vinod Khatke: रक्तदान शिबिरात 86 जणांनी रक्तदान केले. तसेच नेत्ररोग तपासणी व उपचार शिबिरात 132 जणांची नेत्ररोग तपासणी करण्यात आली.

Jun 23, 2026
हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंतीनिमित्त चिखली तालुक्यात १०४ जणांचे रक्तदान

हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंतीनिमित्त चिखली तालुक्यात १०४ जणांचे रक्तदान

Maharana Pratap Jayanti: मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंबही अर्पण करणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त एकूण १०४ रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.

Jun 21, 2026
रक्तदान हीच महाराणा प्रतापांना खरी आदरांजली: आमदार श्वेताताई महाले-पाटील

रक्तदान हीच महाराणा प्रतापांना खरी आदरांजली: आमदार श्वेताताई महाले-पाटील

MLA Shweta Mahale Patil: महाराणा प्रताप जयंती वैशाख शुक्ल दिवशी चिखलीत आयोजित कार्यक्रमात आमदार श्वेताताई महाले-पाटील यांनी रक्तदानासाठी जनजागृती करण्याच्या संकल्पनेमुळे उत्साहपूर्ण वातावरण

Jun 18, 2026