HPV लसीकरण मोहीम उद्घाटन

HPV Vaccination Campaign: हिंगोली जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

हिंगोलीमध्ये जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते HPV लसीकरण मोहिमेचे उद्घाटन झाले.

By : देशोन्नति
HPV Vaccination Campaign: हिंगोली जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते एचपीव्ही लसीकरण मोहीमेचे उद्घाटन

हिंगोली (HPV Vaccination Campaign) : सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र कापडसिंगी येथे आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे हस्ते एचपीव्ही लसीकरण मोहीमेचे उद्घघाटन करण्यात आले. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लस हि अत्यंत सुरक्षित लस आहे. 14 वर्ष पूर्ण झालेल्या व 15 वा वाढदिवस न केलेल्या मुलींना पालकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन (Collector Rahul Gupta) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.

height=576

लसीकरण झालेल्या मुलींना (HPV Vaccination Campaign) लसीकरण प्रमाण पत्र व पुष्पगुछ देऊन गौरव करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण करून घेण्याचा पहिला बहुमान कु. वेदिका साहेबराव हराळ हिला मिळाला असून, एकूण 15 मुलींना आज लसीकरण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ पडोळे, डॉ. हराळ व प्राथमिक आरोग्य केंद्र कापडसिंगी येथील कर्मचारी चमू उपस्थित होता.

height=576

वसमत येथेही लसीकरण
उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे नगराध्यक्ष श्रीमती सुनीता बाहेती यांच्या हस्ते (HPV Vaccination Campaign) लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल तोटेवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसारे, डॉ. सनाउल्ला खान उपस्थित होते.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026