बाल हृदयरोग तपासणी

हिंगोलीत मोफत बाल हृदयरोग तपासणी व उपचार शिबिर; २D इको तपासणीही विनामूल्य

Heart Disease Screening: आरोग्य अभियान, RBSK आणि किम्स हॉस्पिटल्स यांनी हिंगोलीत ९ जुलै २०२६ रोजी मोफत हृदय रोग तपासणी शिबिर आयोजित केली. या शिबिरात ५ ते १८ वर्षांचे मुलांसाठी २D इको कार्डियोग्राफी

हिंगोलीत मोफत बाल हृदयरोग तपासणी व उपचार शिबिर; २D इको तपासणीही विनामूल्य

Heart Disease Screening

हिंगोली (Heart Disease Screening) : राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK आणि किम्स हॉस्पिटल्स ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत हृदय रोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय, रिसाला बाजार, अकोला रोड, हिंगोली येथे पार पडणार आहे.

शिबिरात किम्स हॉस्पिटल्स ठाणे येथील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास एल. आणि डॉ. सोनिया कारापूरकर मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. श्रीनिवास एल. हे सीनियर आणि चीफ कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आहेत. तर डॉ. सोनिया कारापूरकर या कन्सल्टंट पीडियाट्रिक आणि फेटल कार्डिओलॉजिस्ट आहेत.

शिबिरात २D इको तपासणीसह नाव नोंदणी (Heart Disease Screening) पूर्णपणे मोफत असणार आहे. ज्या मुलांना वारंवार न्यूमोनिया होतो, बाळ निळे पडते, वजन वाढत नाही, वेगाने श्वास लागतो, त्वचा ओठ आणि नखे निळी पडतात किंवा प्रचंड घाम येतो अशा लक्षणांकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अपॉईंटमेंटसाठी  गाभणे यांच्याशी ९९२११ २७७०६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026