जिल्हा हिवताप कार्यालय

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा जिल्हा हिवताप कार्यालय हिंगोली येथे आढावा

District Hivtap Office: १८ ऑगस्ट रोजी पुण्याच्या राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण अधिकारी, डॉ. प्रणिल कांबळे यांनी हिंगोलीच्या जिल्हा हितवताप कार्यालयात भेट घेतली.

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा जिल्हा हिवताप कार्यालय हिंगोली येथे आढावा

District Hivtap Office

 

जिल्हा हिवताप कार्यालयात राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची भेट; हिवताप, डेंग्यू व हत्तीरोग नियंत्रणा बाबत मार्गदर्शन

हिंगोली (District Hivtap Office) :  18 ऑगस्ट रोजी जिल्हा हिवताप कार्यालय हिंगोली येथे डॉ. प्रणिल कांबळे, Regional Director, ROHFW, पुणे, श्री. निलेश गोंधळी, Research Assistant तसेच श्री. सुरज मोर्या, Lab Assistant Grade-II, पुणे यांनी भेट देऊन राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी विशेषतः हिवताप, डेंग्यू या डासापासून होणाऱ्या आजारांच्या प्रतिबंध, नियंत्रण, सर्वेक्षण, निदान व प्रभावी उपाययोजनांबाबत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.जिल्हा हिवताप कार्यालय हिंगोली अंतर्गत करण्यात येत असलेल्या संपूर्ण कामकाजाची पाहणी केली व राज्यस्तरीय अधिकारी व टीम यांनी कार्यालयीन कामकाजाचे उत्कृष्ट नियोजन असल्यामुळे कामाबाबत  समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी संजय पवार, तसेच जिल्हा हिवताप कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या भेटीदरम्यान राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, रोग नियंत्रणाच्या उपाययोजना आणि आगामी काळातील कार्यवाही बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.