अन्न सुरक्षा विभाग कारवाई

सर्वत्र भेसळयुक्त कारभार! अन्न भेसळीविरोधात धडक मोहीम; 90 किलो पनीर, 147 लिटर दूध नष्ट

Food Safety Department: पाटणा, हाजीपूर आणि दरभंगा येथे कारवाई, 90 किलो भेसळयुक्त पनीर आणि 147 लिटर दूध जप्त, हाजीपूरमधील दोन आस्थापनांवर छापेमारीदरम्यान 72 किलो पनीर जप्त

सर्वत्र भेसळयुक्त कारभार! अन्न भेसळीविरोधात धडक मोहीम; 90 किलो पनीर, 147 लिटर दूध नष्ट

Food Safety Department

पाटणा (Food Safety Department) : बिहारमध्ये अन्नपदार्थांमधील भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाने (Food Safety Department) राज्यव्यापी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पाटणा, हाजीपूर आणि दरभंगा येथे करण्यात आलेल्या कारवाईत 90 किलो भेसळयुक्त पनीर आणि 147 लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. हाजीपूरमधील दोन आस्थापनांवर छापेमारीदरम्यान 72 किलो पनीर जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासणीत पनीरमध्ये भेसळ आढळल्यानंतर ते नष्ट करण्यात आले. त्याचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, दरभंग्याच्या बेनीपूर येथील एका दूध विक्री केंद्रावर कारवाई करताना 18 किलो भेसळयुक्त पनीर आणि मुदत संपलेले 21 लिटर दूध आढळून आले. अधिकाऱ्यांनी हे दोन्ही पदार्थ जागेवरच नष्ट केले. पाटण्यातील फतुहा येथील एका डेअरीमधून घेतलेल्या दूधाच्या नमुन्यात फॉर्मेलिन आढळून आले. त्यानंतर सुमारे 126 लिटर दूध नष्ट करण्यात आले.

प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई

अन्नपदार्थांमधील भेसळ रोखणे आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे, हा या (Food Safety Department) मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित आस्थापनांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टैग्स: Food Safety Department

संबंधित सामग्री

लातूर जिल्ह्यातील रेणापूरमधील 'बेंगलोर अय्यंगार्स बेकरी'वर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; परवाना निलंबित, दुकान सील

लातूर जिल्ह्यातील रेणापूरमधील 'बेंगलोर अय्यंगार्स बेकरी'वर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; परवाना निलंबित, दुकान सील

लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या मोठ्या कारवाईमुळे अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Jul 18, 2026
एफडीएची कारवाई बेकायदेशीर; गोरस भंडाराला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दिलासा

एफडीएची कारवाई बेकायदेशीर; गोरस भंडाराला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दिलासा

अस्वच्छतेच्या कारणावरून ३१ मे रोजी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) यांनी गोरस भंडारावर केलेली बंदीची कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे.

Jul 07, 2026