माझा गाव-आरोग्य संपन्न गाव

आडगाव येथे ‘माझा गाव, आरोग्य संपन्न गाव’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० रुग्णांची मोफत तपासणी!

My Village Healthy Village: आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझा गाव, आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत आज आडगाव येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

आडगाव येथे ‘माझा गाव, आरोग्य संपन्न गाव’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० रुग्णांची मोफत तपासणी!

My Village Healthy Village

हिंगोली (My Village Healthy Village) : आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझा गाव, आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत आज आडगाव येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये गावातील व परिसरातील जवळपास २०० हून अधिक रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला व औषधोपचार पुरवण्यात आले.

शिबिराच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरोग्य विषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, आडगावचे सरपंच ज्ञानबा (नवसाची) मुटकुळे व उपसरपंच रमेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बदलत्या जीवनशैलीत आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी, नियमित तपासणीचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील चांगल्या सवयी याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली.

मार्गदर्शन सत्रानंतर लगेचच रुग्णांच्या तपासणीला सुरुवात झाली. जिल्हा रुग्णालय हिंगोली व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची बारकाईने तपासणी केली. यामध्ये डॉ. जहीर खान, डॉ. पांडुरंग राठोड, डॉ. विशाल गोरे, डॉ. अमोल दर्गू, डॉ. सुचिता गौतम परदेशी, डॉ. रूपाली वैभव मुटकुळे तसेच समुदाय आरोग्य अधिकारी शीतल ठोके आणि आरोग्य सेवक कोरडे  यांनी रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार केले.

नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती

या (My Village Healthy Village) आरोग्य शिबिराला श्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचे कंदी सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि आडगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच तज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या महत्त्वपूर्ण व समाजोपयोगी आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन आरोग्यदूत मुनीर पठाण यांनी केले होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी त्यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमाबद्दल सर्व ग्रामस्थ व आरोग्य विभागाच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

संबंधित सामग्री

'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानाचा हिंगोलीत श्रीगणेशा

'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानाचा हिंगोलीत श्रीगणेशा

Majha Gaav Arogya Sampanna Gaav: हिंगोलीत पंचायत समितीने 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानाला सुरूवात केली. यानिमित्ताने विविध आरोग्य कार्यक्रमांचे आयोजन

Apr 28, 2026