हिंगोली (Soybeans Crop Damage) : जिल्ह्यात पावसाने दीड महिन्यापासून मोठा खंड दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हिंगोली तालुक्यातील एका शेतकर्याच्या ५ एकरावरील सोयाबीनचे पीक पूर्णपणे करपून गेल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. वाळलेल्या सोयाबीनच्या शेतातच त्याने आपली जनावरे, बैल सोडून दिले आहेत. पाहणी केली असता सोयाबीनचे झाड पूर्णपणे वाळलेले दिसत आहे. एकही शेंग जनावरांच्या खाण्याच्या लायकीची राहिलेली नाही.
या शेतकर्याकडे एकूण २० जनावरे आहेत. त्याने सांगितले की, 'सगळं पीक करपून गेलंय. दीड महिना झाला पाऊसच नाही. ५ एकरात जवळपास एक लाख रुपये खर्च केलाय, तोही वसूल होत नाहीये. शेतकर्याने सरकारकडे मागणी केली आहे की, किमान एकरी ४० ते ५० हजार रुपये मदत मिळावी, जेणेकरून जनावरं आणि लेकराबाळांचं पोषण करता येईल. सर्वात वेदनादायी बाब म्हणजे याच (Soybeans Crop Damage) पिकाच्या भरवशावर शेतकर्याला दसरा-दिवाळीचे सण आणि मुलीचे लग्न करायचे होते. 'मुलगी लग्नाला आली आहे, आता तिचं लग्न कसं पार पाडायचं?' असा प्रश्न विचारताना शेतकर्याला अश्रू अनावर झाले. या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य पुन्हा